लोखंडी फ्रेम छाती व पोटाला लागून तरुणाचा मृत्यू
चालकाच्या निष्काळजीपणामुळे व्रेनवरील लोखंडी फ्रेम हलून ती एका मजुराच्या छाती आणि पोटाला लागल्याने त्यात गंभीर दुखापत होऊन त्याचा केईएम इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रवी गिरी (21) असे त्या मजुराचे नाव आहे. सोमवारी रात्री तो आणि धीरजकुमार असे दोघे आचार्य दोंदे मार्ग ते परळ टी.टी. या मार्गावर व्रेनच्या सहाय्याने लोखंडी फ्रेम घेऊन जायचे काम करत होते. केईएम इस्पितळाजवळील नॅशनल केमिस्टसमोर व्रेनचालकाच्या निष्काळजीपणामुळे व्रेनवरील लोखंडी फ्रेम सरकली आणि ती रवीच्या छाती व पोटाला लागली. परिणामी रवी जागेवरच बेशुद्ध पडला. त्याला लगेच केईएम इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्रेनचालक व सुपरवायझरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मोटरसायकल चोर गजाआड
सराईत मोटरसायकल चोराला चारकोप पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रईस शहा असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने पाच गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच मोटरसायकल्स हस्तगत केल्या आहेत. तक्रारदार हे गोराई येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याची चारकोप परिसरातून मोटरसायकल चोरीला गेली होती. मोटरसायकल चोरी प्रकरणी त्याने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक राजू थोरात, उपनिरीक्षक आबासाहेब पवार, कराटे, शिंदे, पाटेकर, गायकवाड, राणे आदींच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली.
निवृत्त बँक मॅनेजरच्या खात्यावर डल्ला
दिल्लीच्या जामा मशीद येथे झालेल्या बॉम्बस्पह्टाच्या तपासात मोबाईल नंबर आढळून आल्याचे भासवत कारवाईच्या नावाखाली ठगाने निवृत्त बँक मॅनेजरच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. अटकेची भीती दाखवून ठगाने 40 लाख रुपये काढले आहेत. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
Comments are closed.