पिठातली भेसळ ओळखण्यासाठी टिप्स
घरात वापरल्या जाणाऱ्या गहू, बेसन, तांदूळ किंवा इतर पिठांमध्ये कधी कधी भेसळ असू शकते. काही सोप्या पद्धतींनी तुम्ही पीठात भेसळ आहे का ते तपासू शकता. how to identify pure wheat flour
रंग –नैसर्गिक पिठाचा रंग एकसारखा असतो. खूपच पांढरे, चमकदार किंवा असमान रंगाचे पीठ संशयास्पद असू शकते.
वास – ताज्या पिठाला नैसर्गिक धान्याचा सुगंध येतो. कुबट, आंबूस किंवा रसायनासारखा वास येत असल्यास ते वापरू नये..
स्पर्श करून पाहा- पीठ हातात घेतल्यावर मऊ आणि हलके वाटले पाहिजे. खडबडीत कण, गाठी किंवा दगडाचे बारीक तुकडे जाणवत असतील तर भेसळ असू शकते.
पाण्याची चाचणी-एका ग्लास पाण्यात थोडे पीठ टाका. लाकडाचा भुसा किंवा हलकी अशुद्धता असेल तर ती पाण्यावर तरंगू शकते.
चाळणी – पीठ चाळल्यावर दगड, वाळू किंवा इतर कण वेगळे दिसू शकतात.
किडे किंवा जाळी तपासा- : पीठात किडे, अळ्या किंवा जाळीसारखे धागे दिसत असतील तर ते वापरणे टाळा.
खबरदारी
विश्वासार्ह ब्रँड किंवा गिरणीत दळलेलेच पीठ घ्या.
पॅकेजवरील उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख (Expiry Date) तपासा.
FSSAI परवाना क्रमांक असलेले उत्पादन निवडा.
पीठ कोरड्या आणि हवाबंद डब्यात साठवा.
Comments are closed.