नारळी पौर्णिमेला पारंपरिक कोळी लूक कसा कराल?

नारळी पौर्णिमेचा सण संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: कोळीवाड्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण समुद्रपुत्र मानल्या जाणाऱ्या कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी कोळी समाज समुद्राची पूजा करून नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा करतो. या दिवशी अस्सल कोळी लूक करण्यासाठी उपयुक्त टिप्स पाहूयात, narali purnima special koli look tips

महिलांसाठी –

साडी

कोळी महिलांची साडी ज्याला तोकडं लुगडे किंवा कोळी साडी म्हणतात. ही प्रामुख्याने गुडघ्यापर्यंत किंवा थोडी वर नेसली जाते. काही महिला साडीवर खांद्यावर दोन्ही बांजूनी पांढरी ओढणी अंगावर घेतात. ही नेसण्याची पद्धत समुद्रात वावरताना, मासे पकडताना किंवा चालताना सोयीची व सुटसुटीत असावी यासाठी असते. तुम्ही लाल, हिरव्या, निळ्या किंवा पिवळ्या अशा गडद रंगांची साडी निवडू शकता.

दागिने

  • गळ्यात – चिंचपेटी, तन्मणी, आणि माळ किंवा पुतळ्यांची माळ .
  • हातात – जाड बांगड्या.
  • कानात – पारंपारिक बुगड्या
  • नाकात – अस्सल कोळी नाकाची अंगठी
  • कमरेला – कमरपट्टा

हेअरस्टाईल आणि मेकअप

केसांची अंबाडा किंवा वेणी घालावी. त्यावर मोठा गजरा किंवा फुलं लावून सजवा. कपाळावर चंद्रकोर किंवा मोठी टिकली लावून मेकअप पूर्ण करावा.

पुरुषांसाठी

कोळी पुरुषाचा पारंपरिक पेहराव अतिशय साधा, सैल आणि समुद्रावरील कामासाठी सोयीस्कर असतो. यात शर्ट किंवा बनियन, कमरेला विशिष्ट पद्धतीने नेसलेले पांढरे वस्त्र आणि डोक्यावर किंवा गळ्यात उपरणे असते. तुम्ही गळ्यात सोन्याची माळ, हातात कडं आणि डोक्यावर  एखादा रुमाल बांधल्यास लूक अधिक खुलून दिसतो.

या गोष्टी महत्त्वाच्या –

नारळी पौर्णिमेला समुद्राला अर्पण करण्यासाठी बांबूच्या टोपलीत नारळ घेऊन जा. सणाचा आनंद घेण्यासाठी कोळी गाणी लावून नाच केल्यास तुमचा कोळी लूक अधिक अस्सल वाटेल. यासह विशेष म्हणजे कोळी लूक करताना जास्त दागिने आणि हेवी मेकअप करावा.

हेही वाचा – नारळी पौर्णिमेला समुद्राला सोन्या-चांदीचा नारळ का अर्पण केला जातो?

Comments are closed.