थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई, 12 कोटीचा चरस घेऊन आलेले दोघे ताब्यात; लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नशेबाजांना फुल टू झिंगविण्यासाठी परराज्यातून मुंबईत आणलेला तब्बल 12 कोटी 20 लाख रूपये किंमतीचा चरसचा साठा अंमली पदार्थ विरोधी कक्षाने रंगेहाथ पकडला. चरस आणणाऱया दोघांना पकडले. याप्रकरणी पोलिसांना अधिकची माहिती मिळाली असून त्यानुसार पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे.

परराज्यातून दोन व्यक्ती मोठय़ा प्रमाणात चरसचा साठा मुंबईत आणणार असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली. त्यानुसार वरळी युनिटने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोघेजण तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केल्यावर त्यांच्याकडे 12 किलो 200 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा मिळून आला. या प्रकरणाची लिंक उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचे एक पथक अधिक तपासासाठी यूपीला रवाना झाले आहे.

Comments are closed.