भाभा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे खासगीकरण नको, शिवसेनेची मागणी
सद्यस्थितीत महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये परिचारिकांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत आहे. असे असताना वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयातील नार्ंसग कॉलेज एका खासगी कंपनीला चालवण्यास देण्याचा घाट घातला जात आहे. मात्र त्याचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण न करता ते महापालिकेमार्फतच चालविण्यात यावे. तसेच महापालिकेच्या इतर प्रमुख रुग्णालयांच्या धर्तीवर या महाविद्यालयाचा दर्जा वाढवून ते नार्ंसग ‘पदवी’ (डिग्री) महाविद्यालयात रूपांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माफक दरात नर्सिंगचे उच्च शिक्षण घेता यावे आणि महापालिकेच्या रुग्णालयांमधील परिचारिकांचा तुटवडा भरून काढता यावा यासाठी भाभा नार्ंसग कॉलेजच्या खासगीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.
सुधार समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या करारानुसार खासगी कंपनीला भरमसाट निधी उपलब्ध होईल आणि पालिकेचे नुकसान होईल, असे सचिन पडवळ यांनी निदर्शनास आणून दिले आणि खासगीकरणाला विरोध केला.
Comments are closed.