वैशाली, रूपालीनंतर एफडीएकडून औंधमधील वाडेश्वरवरही कारवाई, सहा हॉटेलचे परवाने निलंबित
पुणे शहरातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवरील कारवाईनंतर आता औंध येथील वेस्टएंड मॉलमधील वाडेश्वर रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी वाडेश्वरसह पुणे जिह्यातील सहा हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये औंधमधील वाडेश्वर रेस्टॉरंट, काsंढव्यातील ज्योती रेस्टॉरंट, लोहगावमधील न्यू जायका रेस्टॉरंट, नवी सांगवीतील हॉटेल आमंत्रण, खेडमधील हॉटेल गंधर्व प्युअर व्हेज आणि आळेफाटा (जुन्नर) येथील हेमंत गार्डन रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात आली. हॉटेलमधील स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता या बाबींची तपासणी करण्यात येत आहे.
Comments are closed.