मोठी बातमी: धनंजय मुंडेंना सरकारी बंगला 15 दिवसांत खाली करण्याच्या सूचना, सातपुड्यावर लवकरच छगन

मुंबई: बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्यांदा मंत्रीमंडळ विस्तारामध्ये वगळलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आलं आहे. आता अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गुरुवारी पदभार घेतल्यानंतर आता धनंजय मुंडेच्या सध्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप सातपुडा बंगला हा मुंडेंच्याच ताब्यात आहे. या महिना अखेरीला मुंडे बंगला खाली करणार आहेत. सध्या या बंगल्याचं गेट बंद ठेवण्यात आलं असून याठिकाणी बंदोबस्तला असलेल्या पोलिसांना बंगल्यात कुणालाच न सोडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

छगन भुजबळांचा शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (20 मे) राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेलं मंत्रीपद भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आलं आहे. तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र आली आहेत.

कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला

निवासस्थान राम शिंदे, सभापती, विधान परिषद ज्ञानेश्वरी, राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-8) विशाळगड, चंद्रकांतदादा पाटील ब-1 सिहगड,  गिरीश महाजन सेवासदन, गुलाबराव पाटील जेतवन, गणेश नाईक ब-4 पावनगड ,  दादा भुसे ब-3 जंजीरा, संजय राठोड शिवनेरी,  मंगलप्रभात लोढा ब-5 विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल चित्रकूट, पंकजा मुंडे पर्णकुटी, अतुल सावे अ-3 शिवगढ़, अशोक उईके अ-9 लोहगड, शंभूराजे देसाई मेघदूत, आशिष शेलार व-2 रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-6 सिध्दगड, अदिती तटकरे अ-5 प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले 3-7 पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-27, जयकुमार गोरे क-6 प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि 09, संजय सावकारे अंबर-32, संजय शिरसाठ अंबर-38, प्रताप सरनाईक अर्वतो-5, भरत गोगावले सुरुचि 02, मकरंद पाटील सुरुचि-03, धनंजय मुंडेंना सातपुडा बंगला देण्यात आला होता, त्यांच्या राजीनाम्यानंतर आता हा बंगला छगन भुजबळ यांना देण्यात आला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.