सुधाकर बडगुजर लवाजमा घेऊन मुंबईला निघाले, पण भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, त्यांच्या पक्षप्रवेशाच

भाजपमधील सुधाकर बॅडगुझर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ‘मनपरिवर्तन’ होऊन ठाकरे गटात नाराज असल्याचा प्रबळ आंतरिक जाणीव झालेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप (BJP) मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यासाठी सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चक्रावून टाकणारे विधान केले आहे.  सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी करुन मुंबईला निघालेल्या सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी ती मोठी नामुष्की ठरेल.

तसेच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या बबनराव घोलप यांच्याबाबतही बावनकुळेंनी अशीच भूमिका घेतली आहे. बबनराव घोलप यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. मुंबईत गेल्यानंतर चर्चा झाली, तर हा विषय पुढे जाईल. मात्र, आतापर्यंत या संदर्भात माझ्याकडे कुठलीही माहिती नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Nashik News: सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार की नाही?

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी नाशिकहून हजारो कार्यकर्ते आज सकाळी मुंबईला रवाना झाले होते. कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर ‘आमचं ठरलंय’, ‘भव्य पक्षप्रवेश सोहळा’, असा मजकूर असलेले फलक लावले होते. दहा ते बारा बसेस भरुन सुधाकर बडगुजर  यांचे समर्थक निघाले होते. अनेक दिवसांपासून स्थानिक विरोध असताना आज अखेर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. आम्ही नरिमन पाईंटला सुधाकर भाऊंच्या पक्षप्रवेशासाठी चालल्याचे या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. सुधाकर बडगुजर यांचा आज भाजप पक्षप्रवेश होत आहे. असंख्य बडगुजर समर्थक हे सुधाकर बडगुजर यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी आहे. हिंदुत्व, महिलांसाठी योजना, मोदी सरकारने केलेली कामगिरी अशा अनेक कारणांसाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहेत, असे सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमधून रवाना होण्यापूर्वी म्हटले होते. मात्र, आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=CN0LHN5ZTMQ

आणखी वाचा

स्थानिक आमदारांच्या विरोधानंतरही सुधाकर बडगुजर, गणेश गीतेंसाठी भाजपकडून रेड कार्पेट, उद्या प्रवेशाची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राज’कारण’

आणखी वाचा

Comments are closed.