लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडूनन मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईतील लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. मुंबईतील धावणाऱ्या लोकलला एसीचे डबे लावण्यात येतील, लोकलच्या प्रवास तिकिटात एका रुपयाची वाढ करण्यात येण्यात नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. याला रेल्वे मंत्र्यांनी देखील ते सकारात्मक असल्याचं सांगितलं.
लोकलचे सर्व डबे एसीचे असतील : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना म्हटलं की, अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळात उपनगरीय रेल्वेची एक दुर्घटना झाली. सातत्यानं उपनगरीय रेल्वेला दरवाजे नसल्यानं अपघात झालेले पाहतो. अतिशय वाईट परिस्थिती लोक प्रवास करतात. आज दोन क्लास आपण तयार केले आहेत. एकीकडे मेट्रो आहे, ती पूर्णपणे एसी आहे, जिचे दरवाजे बंद होतात, ज्याच्यामध्ये प्रवासाची इज आहे ती ही मुंबईकरांना आहे. दुसरीकडे उपनगरीय रेल्वे आहे, ज्याच्यात लोक अतिशय दाटीवाटीत लोकं प्रवास करतात,ज्याला दरवाजे नसल्यानं अपघात होतात. म्हणून मा. मोदीजी आणि मा. रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रोसारखे कोचेस उपनगरीय रेल्वेला दिले पाहिजेत. म्हणजे जेपूर्णपणे एसी असतील ज्याचे दरवाजे बंद होतील. ही मागणी केली आहे की हे कोचेस लावले तरी तिकिटात एक रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सांगताना याचं समाधान आहे, आजच सकाळी मा. रेल्वेमंत्री मुंबईत होते. त्यांनी हे सांगितलं, आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत आहोत. लवकरच मुंबईला येऊन अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर आपल्या उपनगरीय रेल्वेचे सर्व डबे मेट्रो सारखे एसी असतील. ते रेट्रो फिटींग नसतील, या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डबे येतील. ज्यामध्ये दरवाजे असतील, या ट्रेन एसी असतील, कुठलिही तिकीटवाढ याच्यात केली जाणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेर पूर्ण होणार : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाचा मी आणि एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. हे विमानतळ सप्टेंबर अखेर पूर्ण होईल. नैनाचा विकास सुरु आहे. वाढवण बंदराचं काम अतिशय वेगानं सुरु आहे, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले, जगातील पहिल्या 10 मध्ये असणारं वाढवण बंदर मुंबई आणि महाराष्ट्राला नवीन मॅरिटाईम ताकद देणार आहे. यासोबत नवी मुंबईत एज्यू सिटी तयार करत आहोत. यात 10 विदेशी विद्यापीठं यावीत, अशी अपेक्षा आहे. त्यापैकी 5 विद्यापीठांनी करार केला आहे. ही विद्यापीठं नामांकित आहेत. त्यांच्या एकूण शिक्षण खर्चाच्या 25 टक्के खर्चात शिक्षण घेता येणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.