खडसेंनी स्वत:च्या मुलाला संपवल्याचा दावा प्रफुल लोढाने केला होता, गिरीश महाजनांनी जुनी आठवण सां
Girish Mahajan on Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हनी ट्रॅपचे (Honey Trap) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात प्रफुल लोढा (Praful Lodha) या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रफुल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे जवळचे संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला. हनी ट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसेंच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या निधनाबाबत मोठा दावा केलाय.
खडसे यांनी प्रफुल लोढा याचे नाव घेत गिरीश महाजन यांच्यावर आरोप केल्यानंतर महाजन यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले. गिरीश महाजन म्हणाले की, खडसे यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांना सर्वदूर अपयश आलेलं आहे. ते सत्तेपासून दूर फेकले गेले आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी लोटांगण घातले. मात्र त्यांना पक्षात कोणीही घेतले नाही. सर्व आजारपण आणि सर्वदूर अपयश यामुळे हा माणूस द्वेष भावनेने पछाडलेला आहे. मी एकनाथ खडसे यांच्यासोबतचे प्रफुल लोढा यांचेसुद्धा फोटो दाखवतो. एकनाथ खडसे यांची मानसिकता खराबच झालेली आहे.
गिरीश महाजनांनी जुनी आठवण सांगितली
निखिल खडसे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी हाच प्रफुल लोढा बोलला होता. काय-काय बरगळला होता. आता खडसे म्हणतात प्रफुल लोढा यांची एसआयटी चौकशी करा. असे असेल तर निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही चौकशीचीही प्रफुल लोढा याने मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे याच लोढाने सांगितलेले आहे. त्यावेळी मी एकनाथ खडसे यांच्यासोबतच राहत होतो. मला त्याबद्दल बोलायचं नाही. मी त्या लेव्हलचा माणूस नाही. पण त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळागलं पाहिजे, अशी आठवण गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना करून दिली.
नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले होते की, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार घडायला लागलेले आहेत. नुकतंच नाशिकचं एक प्रकरण आलं होतं, ज्यात 72 अधिकारी आणि काही लोकं अडकले आहेत, त्याची चौकशी सुरु आहे. दुसरं उदाहरण आता समोर आलं आहे, प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे, गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर देखील एक गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
प्रफुल लोढाने काय दावा केला होता?
प्रफुल लोढाचा जुना व्हिडीओ मंत्री गिरीश महाजन यांनी समोर आणलाय. त्यात प्रफुल लोढा याने म्हटले होते की, माझा मित्र स्वर्गीय निखिल भाऊ खडसे याची आत्महत्या झाली. परंतु मला शंका आहे की, त्याच्या व्यसनापाई एकनाथ खडसे यांची बदनामी होत होती. म्हणून या निखिल खडसेची आत्महत्या झाली की काही काळबेरं एकनाथ खडसेंनी केले, याची चौकशी जशी सुशांतसिंह राजपूतची सीबीआयने केली, तशी निखिल खडसेच्या मृत्यूची चौकशीची मागणी मी न्यायालय, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, शरद पवार, राष्ट्रपती, राज्यपाल, या सर्वांकडे करणार असल्याचे त्याने म्हटले होते.
हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढावर गुन्हा दाखल
सध्या महाराष्ट्रात हनी ट्रॅप प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल लोढावर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. प्रफुल लोढा याच्यावर हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
निखील खडसे यांची आत्महत्या
एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांनी दि. 01 मे 2013 साली आज स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली होती. स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तूलातून त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. निखील खडसे यांनी विधानपरिषेदची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य होते.
https://www.youtube.com/watch?v=trysic8mhzq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.