बारामतीत डंपरनं दुचाकीला अक्षरक्ष: चिरडलं; वडिलांसह दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

बरामती अपघात बातम्या: बारामतीतील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात वडील आणि दोन बहिणीचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आज(27 जुलै) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही अक्षरक्ष: चेंगरल्या गेलेजिवंत. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यानया घटनेत चार वर्षाची मधुरा ओंकार आचार्य आणि दहा वर्षाच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला.ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी आहे. सध्या ते बारामतीतील मोरगाव रोड येथे वास्तव्यास होते. या घटनेने संपूर्ण बारामती हळहळली आहे? सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे?

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने अचानक घेतला पोट

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने साताऱ्यातील भुईंज जवळच्या बदेवाडी हद्दीत अचानक पेट घेतला. या बस मध्ये वीस प्रवासी प्रवास करत होते. चालू बसच्या इंजिन मधून अचानक दूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले यानंतर बसने आगीचे रौद्ररूप धारण केले. यामध्ये शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले आहे. भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून अग्निशामक दलाच्या मदतीने आग विजविण्यात आली… प्राथमिक माहितीनुसार गाडीतील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भंडाऱ्याच्या कुडेगावात तीन वर्षाचा बालक नाल्यात वाहून गेला

घरालगत वाहणाऱ्या नाल्याजवळ खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकाचा तोल गेल्यानं तो तुडुंब भरून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेला. यातचं त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथं घडली. सुशांत उपरिकर (३) असं मृत बालकांचं नावं आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यातचं सर्व नदीनाले तुडूंब भरून वाहत आहे. कुडेगाव येथील नालाही मृत बालकाच्या घरालगत असलेला नालाही दुथडी भरून वाहत असून त्यात ही दुर्घटना घडली. २०० मिटर अंतरावर बालकाचा मृतदेह आढळला असून लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.