वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुडेंना टार्गेट करुन नका, फरार गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल
गोट्या गिटे व्हिडिओ बातम्या: वाल्मिक कराडची (Walmik Karad) दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकणात गोट्या गित्ते आरोपी असल्याची माहिती आधीच मुंडे कुटुंबियांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस गोट्या गित्तेचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांना गोट्या गित्ते सापडत नाही. अशातच दुसरीकडे मात्र गोट्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गोट्या गित्तेने इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गित्ते आरोपी असल्याची माहिती आधीच मुंडे कुटुंबियांनी दिली होती. पोलिसांना गोट्या गित्ते सापडत नसताना दुसरीकडे मात्र गोट्याने इंस्टाग्राम अकाउंट वर व्हिडिओ पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
व्हिडीओत गोट्या गित्तेनं नेमकं काय म्हटलंय?
माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. दुसरा माझा काही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आवाह यांची लाज वाटते. ते म्हणतात की कोणत्यातरी मंदिराचा मुखवटा चोरला. माझ्यावर खूप गुन्हे दाखल होत आहेत विनाकारण, दरोडे, खून, खंडणी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत.
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोपींना फाशी भेटलीच पाहिजे असे गोट्या गित्ते म्हणाला. विनाकारण वाल्किम कराड यांच्या मागे हे जोडलं जात आहे. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. जितेंद्र आव्हाड तुम्ही धनंजय मुंडे यांना टार्गेट करु नका. आमचे दैवत वाल्मिक कराड हे गोरगरीब जनतेची काम करतात. परळीत येऊन कोणालाही विचारा वाल्किम कराड कण आहे ते. त्यांना सर्वजण दैवत मानत आहेत.
जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे व्हाईस रेकॉर्ड
जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे व्हाईस रेकॉर्ड आहेत. भाई तुम बडे, भाई स्वारी स्वारी म्हणल्याला. तुम्ही नेमके कोणाचे आहेत? तुम्ही वजारी समाजाचे नाहीत. तुमाला महागात पडणार असल्याचे गोट्या गित्ते म्हणाला. ज्यावेळी बापू आंधळेचा खून झाला होता, त्यावेळी माझ्यावर देखील दोन गोळ्या झाडल्या होत्या असे गोट्या गित्ते म्हणाला. ते रिपोर्टपण आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. अशातच वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गित्तेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, गोट्या गित्ते आहे कोण? त्याची पार्श्वभूमी काय? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोण आहे गोट्या गित्ते?
ग्यानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या हा मुळ परळी तालुक्यातील नंदागौळचा रहिवासी आहे. सध्या गोट्या गित्ते हा बँक कॉलनी परळी येथे राहत आहे. गोट्या गित्तेवर आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात चोरी हाफ मर्डर दरोडे असे गुन्हे दाखल झाले आहेत.
गोट्या गित्तेवर कोणत्या स्टेशनमध्ये कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल?
307 IPC परळी शहर पोलीस स्टेशन हाफ मर्डर
498 अ IPC पोलीस स्टेशन निलंगा घरगुती
363 364अ पोलीस स्टेशन उदगीर अपहरण
354 34 पोलीस स्टेशन ग्रामीण चोरी प्रकरण
394 439 ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी
307 IPC ग्रामीण पोलीस स्टेशन हाफ मर्डर
394 34 IPC, परळी ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी
394 IPC पोलीस स्टेशन केज चोरी
379.34 परळी ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी
392.34 IPC स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे चोरी
395, IPC किनगाव पोलीस स्टेशन जिल्हा लातूर चोरी
399 IPC चिंचवड पोलीस स्टेशन पुणे चोरी
395 IPC किनगाव पोलीस स्टेशन जिल्हा लातूर चोरी
224 IPC नवा मोंढा लॉक अप मधून पळून जाणे
279.337 IPC पोलीस स्टेशन केज
379 नवा मोंढा परभणी पोलीस स्टेशन
363.364.395 2015 ला दाखल झाला आहे पोलीस स्टेशन माहिती नाही
302 फूड अँड ड्रगचा गुन्हा परळी ग्रामीणला दाखल झाला आहे
आणखी वाचा
Comments are closed.