महादेव मुंडे प्रकरणात वेगवान घडामोडी, संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत? काय काय घडलं?

बीड क्राइम न्यूज: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे खून करण्यात आला . मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर समोर आलेल्या या प्रकरणाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे . आतापर्यंत या प्रकरणात आठ तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत . दरम्यान काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळ जनक दावे केल्यामुळे आणि त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यात आला आहे .महादेव मुंडे खून प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेले एसआयटीचे  प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाले. बीड एलसीबीकडून महादेव मुंडे खून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. प्रकरणातील संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची एक्स वर पोस्ट करत माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं ?

नेमकं प्रकरण काय?

20 ऑक्टोबर 2023 रोजी  परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचापरळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत . हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं,दावा बाळा बांगर यांनी केला होता ..बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या भेटीनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्याच कार्यालयाबाहेर विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचललं होतं .20 ऑक्टोबर 2023 ते आजपर्यंत महादेव मुंडे प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेली नाही .पोलिसांकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आहे

महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडी

2 ऑगस्ट – महादेव मुंडे प्रकरणात आरोपी असलेला गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाडांना धमकी दिल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ परळी जवळील मालेवाडी रेल्वे पटरी वरचा होता.

3 ऑगस्ट – गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकांनी मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली असल्याचा खळबळजनक आरोप माध्यमांसमोर केला.

3 ऑगस्ट – महादेव मुंडे खून प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेले एसआयटीचे  प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाले

3 ऑगस्ट – पंकज कुमावत यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यानंतर बीड एलसीबीकडून महादेव मुंडे खून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली.

3 ऑगस्ट – रात्री महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची एक्स वर पोस्ट करत माहिती दिली.

3 ऑगस्ट – अंजली दमानिया यांनी गोट्या गित्ते जे वाल्मीक कराडला दैवत मानतात ते म्हणतात माझ्यावर खोटे आरोप लावू नका अशी एक्सवर पोस्ट केली.

या पोस्ट मध्ये गोट्यावर बीड,पुणे,परभणी, लातूर अशा चार जिल्ह्यात 16 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.

4 ऑगस्ट – आज पंकज कुमावत हे परळी मध्ये महादेव मुंडे प्रकरणाची माहिती घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.