ओ चौबे, हे बरोबर नाही, मूर्खासारखं…; अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना झापलं, नेमकं काय घडलं?, V

अजित पवार: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. यातील चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे.

पोलीस आयुक्त चौबेंना अजित दादांनी खडसावले-

मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीय?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.

आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात अजित पवार बैठकही घेणार-

आयटी पार्क हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी सकाळी दौरा करत आहेत. सकाळी सहा वाजता पुणेअदृषूकनाशिक महामार्गावरील मोशी येथून या दौऱ्याची सुरुवात झाली. इथून चाकण आणि चाकण एमआयडीसी दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तेथील पाहणी करत, ते नऊ वाजता आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात अजित पवार बैठक घेणार आहेत.

अजित पवारांच्या दौऱ्यानंतर आधी हिंजवडीचे, तर आता माणचे गावकरी एकवटले-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी माण आयटी नगरीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली, मात्र स्थानिकांनी या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. आयटी नगरी विस्तारलेल्या माणचे गावकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.. हिंजवडीनंतर आता माण ग्रामस्थांनीही ग्रामसभा आयोजित करत गावठाणातील प्रस्तावित 36 मीटर रस्त्यांना विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या विकास आराखड्याप्रमाणे गावठाणातील रस्ते 24 मीटर असावेत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. अजित पवारांनी इथल्या रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे आदेश दिलेत, मात्र स्थानिकांचा याला विरोध होत आहे. आता यातून अजित पवार कसा तोडगा काढणार, हे पाहणं महत्वाचं राहील.

https://www.youtube.com/watch?v=S5liwwrjg_jg

संबंधित बातमी:

Gopichand Padalkar Worker Sharnu Hande: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण, हत्येचाही प्रयत्न; आरोपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक

आणखी वाचा

Comments are closed.