मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, जर तुमच्यात थोडाही स्वाभिमान, अभिमान शिल्लक असेल तर…
Uddhav Thackeray & Devendra Fadnavis: सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात तुमची नोंद काय होते, ते महत्त्वाचे असते. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की, तुमच्यात जर थोडासाही अभिमान, स्वाभिमान आणि धैर्य शिल्लक असेल तर वरचा दबाव बघू नका. कारण खालचा दबाव वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ठाकरे गटाकडून सोमवारी मुंबईत महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, अरे तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वर दिल्लीत तुमचे बापजादे बसलेत. तरीही तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना काढायची. देवेंद्र फडणवीसांची हालत म्हणजे, स्वत: काही भ्रष्टाचार केला नाही, मग का त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय, का त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालताय? जगातला सर्वात मोठ्या पक्षाकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. भ्रष्टाचाऱ्यांना दूर करुन मंत्रिमंडळात घ्यायला दुसरे कोणी नाहीत का? देवेंद्र फडणवीसांनी हा भ्रष्टाचार त्यांना पटतोय का, हे सांगावे. त्यांनी एकदा सांगावं की, मला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. अन्यथा त्यांनी वरुन येणारा दबाव झुगारुन द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महाराष्ट्र हा आजपर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. राज्यातील जनतेल जुलूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राला कोणत्या रांगेत नेऊन बसवले आहे? आपल्या काळातही मंत्र्यावर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेण्यात आले. मी मुख्यमंत्री असताना एकाचा राजीनामा घेतला, तो मंत्री अत्यंत वाईट वागत होता. तो वनमंत्री होता,त्याला आपण वनवासात पाठवले. आताचं सरकार जनताभिमूख नाही तर पैसे गिळणारं आहे. आमच्या परबांनी पुराव्यानिशी राज्यगृहमंत्री बार चालवतोय हे दाखवून दिले. रम्मीमंत्र्याला आता आवडीचं खातं मिळाले. शेतकऱ्यांची थट्टा करता, सभागृहात रम्मी खेळता. देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा चालवतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री सांगतात आम्ही समज दिली. समज कसली तर रम्मी नको तर तीन पत्ती खेळा. भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सोडलं तर उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही? धनखड कुठे आहेत, त्यांना समज देऊन का सोडलं नाही?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.