शरद पवारांचा कार्यकर्ता शिवसेनेच्या बैठकीत? शिंदेंच्या दोन गटात जोरदार राडा, एकमेकांची कॉलर पकड
नाशिक बातम्या: नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर, शिंदे गटातील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केली. या झटापटीमुळे काही काळासाठी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले होते. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते. या बैठकीदरम्यानच दोन गटात जोरदार राडा झाला. अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्यात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले. घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे केलं, त्याची दखल घेतली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा आढावा शिंदे साहेबांना देणार आहे. किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झालं आहे. स्वतःच्या प्रसिद्धसाठी त्यांनी बैठकीतील सांगणे हे उचित नाही. आम्ही त्यांना समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती. आम्ही भिंग घेऊन इतर लोकांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटले आहे.
अमोल खताळ यांची प्रतिक्रिया
तर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ म्हणाले की, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेला उपस्थित होते. आतमध्ये वाद झालेला नाही, बाहेर झाला असेल तर मला माहित नाही. बैठकीत कोणत्याही विषयावरून वाद झाला नाही. पक्षाच्या स्तरावर मुख्य नेते एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. मी शिवसेना पक्षात नवीन आमदार आहे. बैठकीमध्ये कोणताही वाद झाला नाही. गैरसमजीतून हा वाद झाला का? यावर वरिष्ठ निर्णय घेतील. सचिन जाधव हे आमचे पदाधिकारी आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांना या प्रकरणाचा अहवाल दिला जाईल. वादाची मला कोणतीही माहिती नाही, मी माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.