आधी मनावर दगड ठेवून काँग्रेस सोडली, नंतर शिंदेंच्या शिवसेनेलाही दोन महिन्यात रामराम, आता दादांच

हेमलाटा पाटील: विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने मनावर दगड ठेवून काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला होता. यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला देखील रामराम ठोकला. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Faction) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवार 19 ऑगस्ट रोजी हेमलता पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हेमलता पाटील यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुकता दाखवली होती. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि माध्यमांशी संवाद साधताना अश्रूंना आवर घालू शकल्या नाहीत. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदासह सर्व पदांचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.  काँग्रेसनंतर फेब्रुवारी 2025 मध्ये हेमलता पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला. मात्र, दीड-दोन महिन्यांतच पक्षात मन न रमल्याने त्यांनी शिवसेनालाही ‘जय महाराष्ट्र‘ केला. आता हेमलता पाटील यांनी पुन्हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निवड केली आहे.

काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

हेमलता पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी तिकीट कापून घातपात केला. माझा राजकीय मर्डर करण्याचा प्रयत्न झाला. भाजपची सत्ता असताना देखील माझ्या मतदारसंघात चांगले वातावरण होते. तरीही नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसने सोडवून घेतली नाही हा घातपात होता. त्यामुळे पुढे भविष्य नाही हे लक्षात आल्यावर मी पक्ष सोडला, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिवसेनेत प्रवेश कसा झाला? हेमलता पाटलांचा खुलासा

तर हेमलता पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश कसा झाला? याबाबतीत देखील खुलासा केला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला, त्यावेळी मी प्रवेशासाठी गेले नव्हते. एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ चर्चा करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी अचानक शिवसेना स्टाईल माझा प्रवेश झाला. ज्यांनी प्रवेश घडवून आणला ते माझे हितचिंतक होते. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. मात्र शिवसेनेची काम करण्याची स्टाईल आणि गटबाजी रुचली नसल्याने मी शिवसेना सोडली, असा खुलासा हेमलता पाटील यांनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला

आणखी वाचा

Comments are closed.