खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश; ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भात ‘दे धक्का’

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत. त्यातच, आता महाविकास आघाडीला धक्का देत काँग्रेस खासदाराच्या दीराचा भाजपात प्रवेश केला आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur) काँग्रेस खासदार प्रतिपा धनॉर्कर (प्रतिपा धनॉर्कर) यांचे दीर अनिल धानोरकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतली.  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. विशेष म्हणजे अनिल धानोकर यांनी तिसऱ्यांना पक्ष बदलला आहे.

चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनिल धानोरकर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 10 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. धानोकर यांनी यापूर्वी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षात काम केले आहे. आता, ते भाजपचे कमळ हाती घेत आहेत.

कोण आहेत अनिल धानोकर?

अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून दोन वर्ष त्यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबीयांची भद्रावती नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यानंतर अनिल धानोरकर यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल जाहीर नाराजी दाखवली आणि वंचितच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. आता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

हे कुटुंब तुम्हाला वेगळं पडू देणार नाही – चव्हाण

ह्या सर्वांचे जनहितासाठी, आपल्या शहरासाठी योगदान राहिलं आहे. गणेश नाईक साहेब ही रस्सीखेच आहे, जितकी पाहिजे त्याहून अधिक रस्सीखेच आहे. तुमच्या सर्वांचे संबंध सांभाळून अनिल धानोरकर यांनी आपल्याकडे येण्याचे ठरवलं, त्यासाठी आभार मानतो. आश्वासित करतो, आम्ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपण एका राष्ट्रीय विचारधारेबरोबर काम केलंय. आपल्या घरातील परिस्थितीची कल्पना आहे, एका कुटुंबातून तुम्ही आला आहात. मात्र, हे कुटुंब तुम्हाला वेगळं पडू देणार नाही, असेही दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी गणेश नाईक यांनी भाषण करताना, येत्या काळात नवी मुंबईत भाजप एक नंबरवर राहणार असल्याचे म्हटले. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे आणि पालघरची जिल्हा परिषद आमच्याकडे राहिल. आम्ही मित्रपक्षांना कमी लेखत नाही, त्यांचा सन्मान राखत 1 नंबरचा पक्ष बनवू, असेही नाईक यांनी म्हटले.

हेही वाचा

आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय; देवेंद्र फडणवीसांचा थेट शरद पवारांना फोन, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच

आणखी वाचा

Comments are closed.