पावणे पाच किलो सोन्यासह रोख रक्कम घेऊन दरोडेखोर लंपास; मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महाम
Buldhana Crime News बुलढाणा: मुंबई येथील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापारासाठी आले होते. काल (22 ऑगस्ट) सायंकाळी ते खामगाव येथून मुंबईकडे जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) त्यांच्या वाहन चालकाने कार थांबवून…मला फ्रेश व्हायचं…, असं म्हणत समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. त्यानंतर लगेचच मागून एका चार चाकी वाहनाने आलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या शेषमलजी जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या कारमधील साडेचार ते पावणे पाच किलो सोने असलेली बॅग व रोकड घेऊन हे दरोडेखोर फरार झाले.
विशेष म्हणजे त्यांचा कारचालक सुद्धा दरोडेखरांच्या वाहनात बसून फरार झाला. तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली असता दरोडेखोरांची कार ही अकोला जिल्ह्यातील पातुर जवळ आढळली. मात्र दरोडेखोर हे पसार झाले होते. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अलीकडेच समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी झालं असलं तरी मात्र वाहनांवर दगडफेक वाहन लुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे.
समृद्धी महामार्गावर पकडला 65 लाखांचा गुटखा, एक जण अटकेत-
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती, त्यावरून मेहकर पोलिसांनी सापळा रचून एका आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 65 लाखाचा गुटखा आढळून आला आहे, पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.