गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा: राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा..व्यवसाय बंद ठेवा..नोकरदार यांनी काम बंद करा…मुंबईकडे निघा….जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) केलं.  संपूर्ण महाराष्ट्र 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी नेमक्या कोणत्या मागण्या आहेत?, सरकारकडून नेमक्या अपेक्षा काय?, याबाबतची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…

– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…

मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? (What did Manoj Jarange Patil say before leaving for Mumbai?)

कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली. गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू आहे. आम्हाला साताराबॉम्बे गॅझेट लागू करावं. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे त्या सगेसोयरे दाखले द्या, आता आंदोलन खूप पुढे गेला असून राज्य अस्थिर करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मला आंदोलन शांततेत पाहिजे. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, अशा सूचनाही मनोज जरांगेंनी दिल्या. आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचं, असं मनोज जरांगे म्हणाले. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो…आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटीलांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=lwkfommzhnc

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.