पापड्या आमदार, तुला जरांगेची काय चाटायचीय ती चाट; लक्ष्मण हाकेंचा विजयसिंह पंडितांवर हल्लाबोल

बीड: गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार विजयसिंह पंडित, मनोज जरांगे यांच्यातील वाद चर्चेत आला आहे, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यांचे बॅनर लावल्याने हाकेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. अशातच एकमेकांना त्यांनी खालच्या शब्दांत, वेगवेगळ्या उपमा देत असल्याने आता हा वाद मोठ्या प्रमाणावर चिघळल्याचं दिसून येत आहे, अशातच हाकेंनी पंडित यांच्यावर आणि जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.

जरांगेंची काय चाटायची आहे, ती चाट, पण…

लक्ष्मण हाके माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, मला काल परवापासून लोक म्हणतात, त्याला पापड्या म्हणतात. तो पापड्या, पापड्या आमदार कुठे गेलाय तो मुंबईत आहे, तो पापड्या म्हणत आहे, मी आंदोलनात सहभागी होणार आहे, त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग आंदोलनात सहभागी व्हावं आम्ही देखील मतदान दिलं आहे, त्याने महाराष्ट्राच्या विधीसभेमध्ये शपथ घेतली आहे, त्या शपथेचा त्याने भंग केला आहे, कायद्याने त्याचे निलंबन झालं पाहिजे आणि तुला जरांगेंची काय चाटायची आहे, ती चाट, पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे. मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी व्हायचे ते हो. त्यांना पर्सनल बोलण्यात काही पॉईंट नाही. असे कितीतरी येतात जातात, असे पुढे लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

साडे 28 किलोचा भूत

गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. आम्हाला अटक करा आणि ही जी तत्परता आमच्या बाबत दाखवत आहात ती तत्परता त्या जरांगेच्या बाबतीत देखील दाखवा. तो रोज मुख्यमंत्र्यांची आई माय काढतो आहे, इथे तुम्ही तुमची तत्पता दाखवता आहात का, आमच्याबाबत काय तुम्ही तत्परता दाखवताय, तुम्ही पाच मिनिटे आधी हातात नोटीस टेकवता आणि गुन्हा दाखल करता. हा जरांगे गेली दोन वर्ष झालं महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसला आहे, साडे 28 किलोचा भूत, हजारो पोलीस प्रशिक्षित विभाग, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवतोय, सामान्य माणसाला वेठीस धरतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत, घर प्रॉपर्टी जळाल्या जात आहेत आणि आजपर्यंत त्याला एकदाही अटक झाल्याचं आम्ही ऐकलं नाही. तुम्ही जरांगे सारख्या माणसाला एक न्याय आणि आमच्यासारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय म्हणजे कायद्यामध्ये पण दुजाभाव आहे का असा सवालही लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला आहे.

जरांगेंच्या सरकार उलथविण्याच्या वक्तव्यावर बोलताना हाके म्हणाले, जरांगेकडे किती आमदार आहेत, त्याने सरकार उलटवलं, तर उद्या परत निवडणुका घेऊन त्यांना सामोरे जाऊ. आमच्याकडे वोट बँक नाही का? चौदा पंधरा टक्के कुठल्या कुठे त्यांचे हलगी वाजवतोय इथे आमच्याकडे नगारा आहे. आमचा नगरा ज्या दिवशी वाजेल त्या दिवशी आसमंत उजळून निघेल, त्यामुळे आम्हाला जास्त छळायच्या भानगडीत पडू नका असा इशाराही पुढे लक्ष्मण हाकेंनी दिला आहे.

त्या आमदारावर इतकं बोलणं योग्य नाही असं मला वाटतंय. पण तो गेवराई चा आमदार आहे, त्याबाबत कालपासून मला कॉल येत आहेत. या माणसाने नदीच्या पात्राची चाळण केली आहे. गोदापात्रामध्ये हा माणूस वाळू चोर म्हणून प्रसिद्ध आहे आणि आता त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळे रेती सम्राट आहेत. माझं मत असं आहे की गोदा नदीचं चाळण करणारा आमदार जिंकणारा या माणसावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? त्याच्यावर मी नक्कीच बोलेन, एक माणूस ओबीसी आरक्षणा संदर्भातली भूमिका घेऊन पुढे जातोय त्याला तुम्ही नोटीस देता आणि वाळूमाफियांना मात्र सोडता. त्यांना अटक करत नाही, त्यांच्या काय गुन्हे आहेत ते पाहून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे याबाबतीत सरकारने तत्परता दाखवली पाहिजे असंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.