मोठी बातमी: आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, हायकोर्टाचे मनोज जरांगेंना नि

हायकोर्ट मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा मंबाब: ऐन गणपतीच्या तोंडावर मुंबईत धडकणारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मुंबईसाठी आम्ही रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आज (26 ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले?

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचं गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…

– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…

https://www.youtube.com/watch?v=SDI_752Z-5U

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; बैठकीत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.