मनोज जरांगे विरोधात ओबीसी समाजाचे तीव्र आंदोलन; अटक करण्याची भाजपच्या ओबीसी सेलची मागणी

चंद्रपूर बातम्या: मराठा समाजाला कुणबी समाजातून सरसकट आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जारंगे यांच्या विरोधात आज चंद्रपुरात ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन केलंवाय. भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा नाका चौक परिसरात ओबीसी समाजाने हे आंदोलन केलंवाय. यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आतापर्यंत 4 आयोगांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाकारलं असताना मनोज जरांगे मनोरुग्णासारखा आरक्षणासाठी हट्ट करत आहे. मात्र त्यांची ही मागणी पूर्णपणे असंवैधानिक असल्याचा ओबीसी आंदोलकांचा दावा आहे.

मनोज जरांगे यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करा

सोबतच त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगेला अक्कल नसेल तर त्याच्यासमोर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे वकील सरकारने बसवावे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही हे सरकारने पटवून द्यावे, असेही आवाहन ओबीसी समाजाने केलं आहे.

खऱ्या ओबीसीलाच तिकीट, डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा : सक्षणा सलगर

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “खऱ्या ओबीसीलाच जिल्हा परिषद, पालिका, महापालिकेचे तिकीट मिळायला हवे. डुप्लिकेट ओबीसींना घरचा रस्ता दाखवा,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

या संदर्भातील व्हिडिओ समोर आला असून, तो लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातील असल्याचे समजते. सलगर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, हायकोर्टाचे मनोज जरांगेंना निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने आज (26 ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; बैठकीत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.