मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगेंना ‘फुल्ल सपोर्ट’; कोणते नेते मैदानात उतरले? जाणून घ्या सव

मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईकडे कूच केले आहे. मुंबईकडे (Mumbai) निघण्याच्या दोन-तीन दिवस आधी त्यांनी बीड (Beed) येथे एक इशारा बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना  तुमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यातील कोणालाही घरी बसून देवू नका, असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यातच आता मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात कोण आहेत ते नेते?

1. प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव (राष्ट्रवादी काँग्रेस) (prakash solanke)

माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, सोळंके यांनी देखील या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

2. संदीप क्षीरसागर – आमदार, बीड विधानसभा (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) (Sandeep Kshirsagar)

बीड हा मराठाबहुल विधानसभा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोकांचा मोठ्या प्रमाणात रेटा होता. त्यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, अलीकडेच त्यांनीही “चलो मुंबई” असा नारा दिला आहे.

3. बजरंग सोनवणे – खासदार, बीड लोकसभा (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) (Bajrang Sonwane)

खासदार बजरंग सोनवणे हे नेहमीच असे म्हणतात की, ते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे खासदार झाले आहेत. आरक्षणासाठी जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर सोनवणे यांनीही धडाडीने आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

4. विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई (राष्ट्रवादी काँग्रेस) (Vijaysinh Pandit)

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आठवडाभरापूर्वीच सोशल मीडियावर “चलो मुंबई” असा नारा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. याशिवाय, त्यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये भव्य पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले.

5. ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Omraje Nimbalkar)

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला आहे.

6. कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Kailas Patil)

आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे मतदारसंघातील जनतेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

7. संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Sanjay Jadhav)

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकारविरोधात हल्लाबोल केला असून, मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल; पारनेरमध्ये जंगी स्वागत, पुण्यातील वाहतुकीत आज बदल

आणखी वाचा

Comments are closed.