हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात नेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी जखमी
बीड : जिल्ह्यातील परळीअदृषूकबीड राष्ट्रीय महामार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या धडकेमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या सरपंचासह त्याच्या नातीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परळी तालुक्यातील (Beed) जळगव्हाणचे सरपंच नातीला दवाखान्यात दाखवून परळीकडून गावाकडे जात असताना पांगरीजवळ समोरून येणाऱ्या हायवाने बुकलाला धडक दिली. या अपघातात सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती चव्हाण या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे? अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर, स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
अपघातातील मृत सरपंच वसंत चव्हाण यांच्या पत्नी कस्तुरबाई चव्हाण याहा अपघात गंभीर जखमी आहेत. या घटनेतील हायवा हा यश कन्स्ट्रक्शनचा असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, चिमुकल्या नातीसह आजोबाचा मृत्यू झआल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघातील हायवा ट्रकही महामार्गावरच थांबलेला होता.
भंडाऱ्यात दोन ठिकाणी वीज कोसळली
आज जिल्ह्यात आहे सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटातसह पावसानं हजेरी लावली. यात भंडारा आणि लाखनी तालुक्यात अशा दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. एका घटनेत भंडारा तालुक्यातील मानेगॉन बाजार शेतशिवारात पाळीव जनावर चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वीज कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला. बबन भादादे (52) असं मृत गुराख्याचं नावं आहे. तर, दुसरी घटना लाखनी तालुक्यातील बोरगावं राजेगाव इथं घडली. दुर्गाप्रसाद लांकार यांच्या घरावर वीज कोसळल्यानं घरातील वीज उपकरणांसह काही साहित्य जळून खाक झालं. वीज कोसळल्याने घराच्या खिडक्यांचे तावदान फुटलेत तर भिंतींना तडे गेलेत. दरम्यान, याघटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली?
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.