रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचं नुकसान

रील स्टार प्रतिक शिंदे अपघात: पुणेअदृषूकसोलापूर महामार्गावर मदनवाडी (सकुंडे वस्ती) गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली. या अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. हा अपघात रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) याच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला.

अवघ्या महिनाभरापूर्वी मोठ्या दिमाखात खरेदी केलेली त्याची टोयोटा फॉर्च्युनर (एमएच 42 बीएस 0111) गुरुवारी अपघाताचे कारण ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले आपल्या क्रेटा गाडीतून महामार्गावरून जात होते. त्यावेळी प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. परिणामी तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले. “लोकप्रियतेच्या नावाखाली काहीजण फिल्मी स्टाईलमध्ये गाड्या चालवतात. यामुळे सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा बेपर्वा वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. भिगवण पोलिस ठाण्यात प्रतीक शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आणि इतरांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अपघातामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील घाटकोपरच्या LBS रोडवर भरधाव आलेल्या कारचा भीषण अपघात झाला. बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. सदर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. कारमध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यावर कार चालणारा तरूण घटनास्थळावरून रिक्षातून बिनबोभाट पळून गेला. तर तरूणी तिथेच थांबल्या होत्या. दोन्ही तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.