शरद पवार गटाच्या शिबिराला 5 आमदार अन् 2 खासदारांची दांडी, नेमकं कारण काय? कोण आहेत ते नेते?

एनसीपी शरद पवार दुफळी शिबीर मध्ये नशिक: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 14 सप्टेंबर) नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

मात्र, या पार्श्वभूमीवर पक्षातील 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभेत पक्षाचे एकूण 10 आमदार असून त्यापैकी फक्त 5 आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली, तर 5 आमदार अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे सोलापूर जिल्यातील चार पैकी तीन आमदार या शिबिराला अनुपस्थित राहिले आहेत. सोलापूरमधील आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण आबा पाटील, आमदार उत्तम जानकर यांनी शिबिराला दांडी मारली आहे.

शिबिराला 5 आमदार अन् 2 खासदारांची दांडी

1) खासदार अमोल कोल्हे : तब्येतीच्या कारणास्तव ते शिबिराला आले नाहीत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमोल कोल्हे यांनी याबाबत पत्र दिलं आहे.

2) आमदार रोहित पाटील : घरात दुःखद घटना घडल्यामुळे ते या शिबिराला उपस्थित राहिले नाहीत.

3) राजू खरे : शस्त्रक्रिया पार पडली असल्याने ते अनुपस्थित आहेत.

4) खासदार सुरेश म्हात्रे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वात कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे ते अनुपस्थित आहेत.

5) आमदार अभिजीत पाटील : (अद्याप कारण स्पष्ट नाही.)

6) आमदार नारायण आबा पाटील : (अद्याप कारण स्पष्ट नाही.)

7) आमदार उत्तम जानकर : (अद्याप कारण स्पष्ट नाही.)

जयंत पाटील देखील उशिराने पोहोचले

दरम्यान, राष्ट्रवादी  शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) अनुपस्थित होते. जयंत पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले. शिबिरात उशिरा येण्यासाठी भारतीय रेल जबाबदार असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad Speech : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, शरद पवार गटाच्या शिबिरातूनच जितेंद्र आव्हाड सरकारवर तुटून पडले; म्हणाले, मराठा-ओबीसी वाद लावण्यात…

Sharad Pawar on Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे हात असल्याच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, आमचा कवडीचाही..

आणखी वाचा

Comments are closed.