मतदारवाढीवरून विरोधकांनी रान उठवलेले असतानाच राज्यात 14 लाख नव्या मतदारांची भर, 4 लाख नावे वगळल

महाराष्ट्र मतदार यादी: लोकसभा (Lok Sabha Election) आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान (Vidhan Sabha Election) अवघ्या सहा महिन्यांत 40.81 लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी 14.71 लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे.

मतदार यादीत मोठी वाढ

27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या 9,70,25,119 वरून 9,84,96,626 इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण 18,80,553 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान, 4,09,046 जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण 14,71,507 मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही.

1 जुलैपर्यंतची यादीच स्थानिक निवडणुकांसाठी अंतिम

“पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी वापरण्याचा विचार होता. मात्र, आता 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली यादीच अंतिम मानण्यात येणार आहे. कारण मतदार नोंदणी ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे,” अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घरबदलामुळेही मोठ्या प्रमाणावर नोंदणी

या नव्या मतदारांपैकी 1.96 लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (32,031), ठाणे (27,386), आणि मुंबई उपनगर (25,831) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.

सर्वाधिक मतदार कुठे वगळले?,पाच टॉपचे जिल्हे

ठाणे : 45 हजार 800
मुंबई उपनगरे : 44 हजार 172
पुणे: 43 हजार 961
नाशिक : 35 हजार 479
जळगाव : 26 हजार 639

सर्वाधिक मतदार कुठे वाढले?,पाच टॉपचे जिल्हे

ठाणे : 2 लाख २5 हजार 866
पुणे: 1 लाख 82 हजार 490
पालगर: 97 हजार 100
मुंबई उपनगरे : 95 हजार 630
नागपूर : 70 हजार 693

सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यांत?, टॉपचे पाच जिल्हे

पुणे : 90 लाख 32 हजार 080
मुंबई उपनगरे : 77 हजार 81 हजार 728
ठाणे : 74 लाख 55 हजार 205
नाशिक : 51 लाख 28 हजार 974
नागपूर : 45 लाख 96 हजार 690

https://www.youtube.com/watch?v=inor-oevppo

इतर महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मतदारसंघ, महाराष्ट्रातील राजुरा, मतदाराचे नाव YUH UQJJW, पत्ता, Sasti, Sasti, Sasti मोबाईल नंबर राज्याबाहेरचा; राहुल गांधींकडून आयोगाचे पुन्हा वाभाडे

Rahul Gandhi: पहाटे चारलाच 36 सेकंदात नाव डिलीट, 14 मिनिटात 12 डिलिशनचे अर्ज, काॅल सेंटर, साॅफ्टवेअरचा वापर करत मध्यवर्ती पद्धतीनं हजारो नाव मतदार यादीतून डिलीट; राहुल गांधींचा नवा बाॅम्ब!

आणखी वाचा

Comments are closed.