शिवसेना शिंदे गटाच नियोजन ठरलं! यंदाचा दसरा मेळाव्याची ‘यांच्यावर’ असणार विशेष जबाबदीरी

Shivsena Dasara Melava : मुंबईच्या आझाद मैदान येथे होणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मुंबईच्या पदाधिकार्यांवर देण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या नियोजनाच्या पार्शवभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून 5 ते 6 समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मैदान समिती, भोजन समिती, पार्किंग समिती वाहतूक नियोजन, स्टेज समिती यांचा समावेश असणार आहे? शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकित या जबाबदारी आणि त्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती पुढे आली आहे?

दरम्यान, यंदाच्या दसरा मेळाव्या संदर्भात मुंबईचे आमदार आणि नवनिर्वाचित विभागप्रमुख यांच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे? मुंबई महानगर पालिकेच्या अनुषंगाने दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून रेकाॅर्डब्रेक गर्दी करून शक्तीप्रदर्शन करण्याचा या बैठकित निश्चय करण्यात आला आहे? त्यामुळे एकीकडे नियम ठाकरे उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूनी दसऱ्या मेळ्याव्याची जय्यत तयारी केली असताना शिवसेना पक्षानेही आता कंबर कसल्याचे चित्र आहे?

शिवाजी पार्कात ठाकरेंचा आवाज घुमणार

दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. त्यामुळे यंदा देखील शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच होताना दिसते. यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी बदलापूर, कल्याण, पश्चिम भिवंडी आणि अंबरनाथ येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्याच दिवशी त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथचा दौरा केला. राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील सुदामा हॉटेलजवळ काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच कल्याण, डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी कल्याणमधील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. राज ठाकरे यांच्या हस्ते अंबरनाथ आणि कल्याणमधील मनसे शाखांचे उद्घाटनही करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाकरे बंधूंनी एकाच दिवशी या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

आणखी वाचा

Comments are closed.