अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून ‘त्य
Chandrakant Patil on Ajit Pawar : राज्यातील सामाजिक वातावरणात निर्माण होत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूरमधील चिंतन शिबिरात (NCP Chintan Shibir) राज्याच्या हितासाठी काम करताना कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी, बार्टी आणि इतर संस्थांना मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असे वक्तव्य केले होते. आता यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेडमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अजित दादांचं म्हणणं अगदी योग्य आहे. इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार आहे. गुंतवणूक येण्यासाठी सर्वांत आधी पाहिलं जातं ते इथलं वर्क कल्चर. सध्या वर्क कल्चर दिवसेंदिवस बिघडत चाललंय. गावोगावी जी सामाजिक आणि जातीय आंदोलने सुरू आहेत, त्याचा थेट परिणाम राज्याच्या औद्योगिक विकासावर होतो आहे. बीडमध्ये तर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर आडनाव लावता येत नाही, अशी परिस्थिती आहे. संतांनी आयुष्यभर एकता, समता यासाठी कार्य केलं. अशा घटनांनी त्यांच्या आत्म्याला निश्चितच दु:ख होत असेल,” असं त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली
दरम्यान, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नांदेड विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभास उपस्थित होते. हा समारंभ संपल्यावर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण ही आपल्या देशाची प्राथमिकता प्राधान्य नाही तर दोन वेळचे जेवण ही आपली प्राथमिकता असल्याचं अजब विधान केलंय. महाराष्ट्राची सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटली आहे. गावागावात जातीवरून जे सुरू आहे ते महाराष्ट्राला मारक आहे. संतांनी समतेची एकीची शिकवण दिली पण आताचा महाराष्ट्र पाहून संतांच्या आत्म्याला देखील वेदना होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरमधील चिंतन शिबिरात राष्ट्रवादी मंत्र्यांना सज्जड दम दिल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला. तसेच, पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावीच लागतील, अशी अट देखील त्यांनी घातली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.