आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! लोखंडी कत्तीनं तरुण व्यापाऱ्यावर हल्ला, जीव वाचवण्यासा

बीड: बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मगरवाडी येथे जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करत हल्ला झाल्याची (Beed Crime News) घटना घडली आहे. गोपाल जाधव हे आपल्या दुकानाबाहेर बसले असताना जयपाल आशोक माने व त्याचा साथीदार निशांत विष्णु जागिर या दोघांनी हा हल्ला केला. यावेळी माने याने कपड्यात (Beed Crime News)लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव याच्यावर हल्ला केला. डावा हात पुढे केल्याने या हल्ल्यात ते बचावले मात्र जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जाधव यांनी कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला.(Beed Crime News)

Beed Crime News: तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही

यावेळी दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही,” अशी यावेळी धमकी दिली. जाधव याने गावातील मित्राच्या घरी आश्रय घेत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठल्याने त्याचे प्राण वाचले. जखमी जाधव याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Beed Crime News)

या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान,आरोपी जयपाल माने यासही सायंकाळी काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर डोक्यावर, चेहऱ्यावर वस्तूने तर मानेवर धारदार शस्त्राने वार

तळोजामध्ये १७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान कामाला गेल्यानंतर १७ वर्षीय मुलीच्या व्यक्तीने डोक्यात, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण करून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (Mumbai Crime News) गंभीर दुखापत केली. यात ती जखमी होऊन तिचा मृत्यू (Mumbai Crime News)  झाला. तळोजा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले. आरोपीविरोधात १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा फेज २ मधील आसावरी सोसायटीमध्ये १७ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.

आई-वडील कामावरून घराकडे परतल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तळोजा पोलिसांनी तपास केला असता गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.