मुंबई, पुण्यातील मराठी कलाकारांनो मराठवाड्यातील बांधवांची मदत करा, अमोल मिटकरींची कलाकारांना भा


अमोल मिटकरी: आठवडाभरापासून मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे . धाराशिव बीड लातूर जिल्ह्यासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे .नद्यानाल्यांना पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुंबई पुण्यात राहणाऱ्या मराठी कलावंतांना मदतीचे आवाहन केले आहे . सोनू सूद (Sonu Sood) जसा पंजाबच्या मदतीला धावला . तितकी मदत नको पण निदान  फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना मदत करा .याच मराठवाड्याने आपल्याला फाळके पुरस्कारापासून ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे असं म्हणत मिटकरींनी कलाकारांना भावनिक साद घातली आहे . x माध्यमावर पोस्ट करत त्यांनी कलाकारांना मदतीसाठी पुढे सरसावण्याचे आवाहन केले आहे .

मराठवाड्यातील परिस्थिती सध्या भीषण आहे .  सध्या पूरग्रस्त भागात मदतीची नितांत आवश्यकता असून अन्नधान्य औषधे कपडे निवारा अशा मूलभूत गरजांसाठी लोक त्रस्त आहेत .

कलावंतांना पूरग्रस्तांना मदतीसाठी हाक

दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा महापूर आला आहे . अजून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत .अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे .पुराच्या पाण्याने गावच्या गाव वेढली गेली आहेत .नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत .दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मराठी कलावंतांना मदतीचे आवाहन केले आहे . x माध्यमावर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे .

ते म्हणाले, सर्व मराठी कलावंत, पुण्या मुंबईत राहणारे सिने अभिनेते,  गायक शाहीर यांना विनंती .सोनू सूद जसा पंजाबच्या मदतीला धावला तितकं नाही पण निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना मदत करा .याच मराठवाड्याने आपल्याला फाळके ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे .असं त्यांनी म्हटलं .

आणखी वाचा

Comments are closed.