दसरा मेळाव्यालाच उद्धव ठाकरेंना धक्का करणारे राजन तेली कोण?
राजन तेलने ठाकरे शिबिर सोडले: अवघ्या वर्षभरापूर्वी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेले कोकणातील नेते राजन तेली यांनी दसऱ्याच्या दिवशी राजकीय सीमोल्लंघन करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला. राजन तेली यांनी गुरुवारी शिंदे गटाच्या मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2025) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी ऑक्टोबर महिन्यात राजन तेली (Rajan Teli) यांनी सिंधुदुर्गातील राणे कुटुंबीयांच्या एकाधिकारशाहीवर टीका करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या वर्षभरातच राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.
२०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना ७०९०२ मते मिळाली, तर राजन तेली यांना २९७१० मते मिळाली. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना ६९७८४ मते मिळाली, तर तेली यांना ५६५५६ मते मिळाली. केसरकर यांना १३ हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. गेली अनेक वर्षे तेलींनी केसरकरांना कडवी झुंज दिली होती.
Who is Rajan Teli: कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म 25 जून 1990 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला.
1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केल.
1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.
1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.
1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.
2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.
2007 साली विधान परिषद आमदार.
2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचा चेअरमन.
2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.
2020 साली भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद.
https://www.youtube.com/watch?v=jsvjlwwvexm
आणखी वाचा
दसऱ्यादिवशीच ठाकरेंना धक्का! निष्ठावंत राजन तेली शिंदे गटात, मेळ्याव्यातच केला प्रवेश
आणखी वाचा
Comments are closed.