सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा कदमांचा हेतू; आता शिवसेनेच्या मंत्र्याने
सुषमा आंधारे वर दादा भुस: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा आरोप रामदास कदम यांनी केला. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हेतू रामदास कदमांचा असल्याचा आरोप केला. आता यावरून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
दादा भुसे ऑन सुषमा अंदरे: काया मनाले दादा भुसे?
दादा भुसे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता दादा भुसे म्हणाले की, तुम्ही जे नाव घेतले त्या शिवसेनेत कधीपासून आहेत? त्यांना शिवसेना किती माहिती आहे? ठाकरे साहेबांचे जितके शिलेदार होते त्यात एक रामदासभाई होते. शिवसेना वाढली त्यात अनेक नेते आहेत. त्यात रामदास भाई देखील आहेत. काही नेते वेगळ्या पक्षात गेलेत. नारायण राणे, छगन भुजबळ यांचाही शिवसेना वाढविण्यात सहभाग आहे. तसेच रामदास भाई कदम आहेत. सुषमा अंधारे यांनी काय टीका करायची याचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
Dada Bhuse on Nashik Raigad Guardian Minister Post : पालकमंत्रीपदाबाबत दादा भूसेंची मिश्कील प्रतिक्रिया
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. आता यावर मंत्री दादा भुसे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. आता तो विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. दादा भुसे यांच्या मिश्कील प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, Video:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.