आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदारांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली


मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. मात्र, दुसरीकडे मतदार याद्यांमधीळ घोळ दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका न घेण्याची भूमिका विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केली आहे. त्यावरुन, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर, आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर हिंदू-मुस्लीम असा वाद उपस्थित केला असून त्यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे. नितेश राणेंच्या मेंदूचा किंवा भाजपचा तो प्रॉब्लेम आहे. हिंदू- मतदार, मुस्लिम मतदार असा भेद नितेश राणेंच्याच डोक्यात येऊ शकतो. आम्हाला फक्त बोगस मतदार हेच कळतात, जो घोळ लोकसभा विधानसभेला झाला हा एकाच वेळेला झाला आहे. नितेश राणेंनी उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केलाय. तसेच, नितेश राणेंना आचार्य अत्रेंचं पुस्तक पाठवीन मग त्यांना रेफरन्स लागेल. राज साहेब स्वत:च्या विचारांनी चालतात इतरांच्या नाहीत, राणेंसारखे आम्ही विविध कुबड्या बदलत नाहीत. कधी काँग्रेस, कधी भाजप, आम्ही कणकवलीतही याद्या तपासणार आहोत. आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी नितेश राणेंना लक्ष्य केलं.

राग भाजपला का येतो?

वाढवणमध्ये मराठी लोकांनाच नोकरी देणार आहेत का? आम्ही निवडणूकआयोगाला प्रश्न विचारतोय, पण राग यांना, भाजपला का येतोय. प्रश्न अदानी-अंबानी यांना विचारलं की राग यांना का येतो. या दोघांनी अंबानी-अदानींशी संबध काय? हे पहिलं स्पष्ट करावं, असेही देशपांडे यांनी म्हटलं.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते त्यावर लोक विचार करतात, असा आतापर्यंत अनुभव आहे. पण, कालच्या झालेल्या सभेनंतर अशा पद्धतीचे  व्होट चोरीचे आरोप हे लोकसभेनंतर का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने लोकसभेत एका-एका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा व्होट चोरीचे, व्होट जिहादचे कोणीच आरोप केले नाहीत. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं. तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधाळला गेला त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हिंदुत्व विचारांचे सरकार येण्यासाठी भगव्या गुलालाने दिले.

हेही वाचा

नमाज पडायला दुसरीकडे जागा नाही का? ⁠हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा बोललं तर चालेल का? शनिवारवाडा प्रकरणावरून नितेश राणे भडकले

आणखी वाचा

Comments are closed.