Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचं कार्य, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंचं वक्तव्य चर्चेत


मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून मुंबईचा (Mumbai) महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे आणि भाजपा यांच्यात राजकीय युद्ध रंगलं आहे. भाजपने यंदा मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर, मुंबई महापालिका हातातून जाऊ न देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच, दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (mahesh kothare) केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, मुंबईचा महापौर भाजपचाच (BJP) होणार, मी मोदीभक्त आहे, असे वक्तव्य कोठारे यांनी एका कार्यक्रमात केले होते. महेश कोठारे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवाळीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असून आगामी निवडणुकांची किनार यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळत आहेत. मुंबईतील बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी थेट आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल, असे वक्तव्य केलं. तसेच, मोदीभक्त आहे, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, अशी राजकीय फटकेबाजी कोठारेंनी केलीय.

महापौर भाजपचाच होईल

कोठारे यांनी लोकसभा निवडणुकांचा संदर्भही यावेळी दिली. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीयमंत्री म्हणून निवडून येत आहेत. आता जर या विभागातून येणारा नगरसेवक हा केवळ नगरसेवक नसेल तर भाजपने ठरवलं, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचं तर मुंबईचा महापौर इथूनच निवडला जाईल, असेही महेश कोठारे यांनी म्हटलं. महेश कोठारेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता, राजकीय वर्तुळातून यावर काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


एकनाथ शिंदे चौटूक, असे दानकेबाज म्हणाले

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’चं उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे आणि अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती. येथे भाषण करताना महेश कोठारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. “धडाकेबाज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना खरोखरच रत्न दिलं आहे. या शहराला नाट्यकलेचं भव्य स्थान दिलंय, त्याबद्दल आम्ही सर्व कलाकार मनापासून खुश आहोत.” शिंदे साहेब जे काही करतात, ते धडाकेबाजच करतात, अशी उद्घाटन समारंभ मी याआधी कधीच पाहिली नव्हती, असेही कोठारे यांनी म्हटलं

हेही वाचा

ते दणकेबाज… महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले

आणखी वाचा

Comments are closed.