महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा; प्


फलटण डॉक्टरचा मृत्यू : सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor death) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (Gopal Badne) याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर (Prashant Bankar) नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटले आहे की, आरोग्य विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला. याशिवाय, या प्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही पोलीस उपनिरीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मयत डॉक्टरच्या कुटुंबाची सांत्वनपण भेट घेतली. यानंतर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

Praniti Shide on CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या आत्महत्या प्रकरणात मृत डॉक्टरवर वरिष्ठांचा मोठा दबाव होता. अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड पत्र एक महिन्यानंतर समोर आणले. मात्र मयत डॉक्टरने अनेक तक्रारीचे पत्र वरिष्ठांना दिले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी महिलेला संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारावर खालच्या पातळीवर टीका करण्यातच वेळ वाया घालवला. महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती खालच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच, या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Phaltan Doctor death: नेमकं प्रकरण काय?

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा

Phaltan Doctor death: फलटणमधील डॉक्टर तरूणी ‘त्या’ रात्री हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर

आणखी वाचा

Comments are closed.