श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंच
बच्चू कडू शेतकरी आंदोलन : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. कारण बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या (Farmers Agitation) मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. त्याआधी कर्जमाफी कशी असावी यासंदर्भात बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठे विधान केलं आहे.
Bachchu Kadu: कर्जमाफी कशी असावी, कोणाला मिळावी?
जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे किंवा जे व्यापारी आहेत, ज्यांनी फक्त गुंतवणूक करण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये असे बच्चू कडू म्हणाले आहेत. डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला आता सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधावे आणि त्यांना कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे जरी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे असले, बहुतांशी वैदर्भीय शेतकरी ओबीसी असले, तरी आज जरांगे पाटील शेतकरी हितासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या येण्याला जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, म्हणून जरांगे पाटील यांचं आम्ही स्वागत करतो असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान परसोडीच्या मैदानावर प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नाही, प्रशासन नेहमीच आंदोलकांना आपला शत्रू समजतो त्यामुळेच परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था झाली अशी नाराजी ही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
Bacchu Kadu news: ‘डिजिटल इंडिया’मुळे हे काम अवघ्या पाच-दहा मिनिटांत होऊ शकते
आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, अशी रोखठोक भूमिका आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मांडली आहे, ‘सरकारी नोकर, पेन्शन घेणाऱ्या आणि टॅक्स वाचवण्यासाठी शेती करणाऱ्या धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका,’ असे स्पष्ट विधान बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांच्या मते, गरजवंत शेतकरी शोधून केवळ त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. ‘डिजिटल इंडिया’मुळे (Digital India) हे काम अवघ्या पाच-दहा मिनिटांत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Bacchu Kadu news: सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर… बच्चू कडू काय म्हणाले?
सर्व शेतकरी नेते एकत्र आले हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. आम्ही एकत्र आल्याने शेतकऱ्यांना बळ मिळते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाहीत. आजच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी , पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, 20 टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
Nagpur Farmers Andolan: शेतकरी लढ्यासाठी देऊन टाकलंय, भावाची प्रतिक्रिया
आमचा लहान भाऊ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहे. त्याने शेतकरी हिताचा आणि कर्जमुक्तीचा निर्णय घेऊनच परत यावे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांचे मोठे बंधू बाळू बाबाजीराव कडू यांनी दिली आहे. आमच्या आईने आधीपासूनच बच्चू कडू यांचा शेतकरी हितासाठीचा लढा पाहून त्याने संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी द्यावं, असं सांगितलं होते. आम्हीही कधीही बच्चू कडू यांना कौटुंबिक जबाबदारी अडकवत नाही. बच्चू कडू यांना आमच्या कुटुंबाने एका प्रकारे शेतकऱ्यांच्या लढासाठीच दिले आहे, असे बाळू कडू यांनी सांगितले.
Bacchu Kadu Demands: बच्चू कडूंच्या मागण्या काय काय?
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करावे.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. पिक कर्जा बरोबरच, मध्यम मुदत, पॉली हाउस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा.
उसाला सन 2025-26 या वर्षासाठी 9 टक्के रिकव्हरी साठी प्रति टन 4300/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी 430/- रुपये एफ.आर.पी. द्या. आजवरची थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना द्या.
कांद्याला किमान प्रति किलो 40/- रुपये भाव द्या. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन.सी.सी.एफ.चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा.
दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या. गायीच्या दुधाला किमान 50/- रुपये बेस रेट व म्हशीच्या दुधाला 65/- रुपये भाव द्या. दुध क्षेत्राला एफ. आर. पी. व रेव्होन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. दुध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण घ्या.
Bacchu Kadu Demands: बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या
1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
2) कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
5) नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.
आणखी वाचा
Comments are closed.