रूपाली पाटील ठोंबरेंच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून महिलेस अमानुष मारहाण; व्हिडीओ सोशल मिडीयावर


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी गुंड पाठवून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला आहे, याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं दिसून येत आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. मारहाण झालेल्या माधवी खंडाळकर यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. (Rupali Patil Thombare)

Video Viral: व्हिडीओमध्ये महिलेने काय म्हटलंय?

रूपाली पाटील आणि तिची बहीण, मावशी, मैत्रीण कोण ती मला माहिती नाही आणि तिचा भाऊ सगळेजण इथे मला मारहाण करत आहेत. माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केली, केवळ मी काल एक पोस्ट केली होती, माझं वैयक्तिक मत लोकशाही म्हणून मांडलं होतं. त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, हे सगळ रूपाली पाटील यांनी केलेलं आहे. त्यांची बहीण प्रिया पाटील या सगळ्यांनी मिळून हे सर्व कारस्थान केलं आहे सर्वांनी याची दखल घ्या, असेही मारहाण झालेल्या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.


Rupali Patil Thombare: मी बीड वरून पुण्याला येत आहे

तर राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता मात्र त्या त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यासंदर्भात मी बीड वरून पुण्याला येत आहे असं रूपाली ठोंबरे यांनी सांगितलं आहे. कदाचित माझ्या आत्म्याने त्यांना मारहाण केली असेल असं रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे. मारहाणीच्या आरोपावर रूपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, मात्र यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्टीकरणात म्हटलं….

तर रूपाली ठोंबरे पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, मी बीडमध्ये आहे. बीडमधून मी आता पुण्याला येत आहे. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदडलं असेल, घरातल्या कोणी का मारलेलं आहे? काय वाद झाला आहे? या सगळ्याचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. याबाबत इतकंच कळलं आहे की, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार देत आहेत. काय तक्रार देत आहेत? कशाबाबत तक्रार देत आहेत? काय झालेलं आहे? याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेन, सगळ्या माध्यमांना संपूर्ण महाराष्ट्राला मी माहिती घेऊन सांगेन.

इथे कोणाचा काय वाद झाला आहे? कोण गंभीर आहेत? खंडाळकर कोण आहेत? माझ्या घरचे कोण आहेत? काय वाद झाला आहे? त्याची माहिती मी घेईन, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. एकमेकांविरोधात तक्रार देत आहेत, कोणाची चूक आहे ते समोर येईल, हा खुलासा फक्त मी बाहेर आहे बीडमध्ये आहे त्यामुळे देत आहे, असेही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

NCP Sharad Pawar Post: राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली पोस्ट

राष्ट्रवादी शरद पवार गटाने या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, व्हिडीओसोबत लिहलं आहे की, रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून सदरील महिलेस (माधवी खंडाळकर) रुपाली ताई समर्थकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्येज्यामध्ये अजित दादांच लैच अवघड झालंय.या ठिकानी एका रूपाली ताईंना आवरायला जावं तर त्याठिकाणी दुसरी रूपाली ताई कांड करून ठेवायल्यात..! सार्वजनिक जीवनात काम करत असताना राजकीय जीवनात काम करत असताना दादांनी किती तो त्रास सहन करायचा म्हणावं त्याठिकाणी..!

आणखी वाचा

Comments are closed.