आधी रक्तबंबाळ अवस्थेत रुपाली पाटलांवर गंभीर आरोप; नंतर घेतला यू-टर्न, गैरसमजातून सगळं घडल्याचं
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होता, याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये (Video Viral) दिसून येत होतं. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. मारहाण झालेल्या महिलेच नाव माधवी खंडाळकर असल्याची माहिती समोर आली होती, रूपाली पाटील ठोंबरेंवरती गंभीर आरोप केल्यानंतर आता या महिलेने यू-टर्न घेतला आहे. (Rupali Patil Thombare)
Madhvi Khandalkar: गैरसमजुतीतून वाद वाढत होते
रुपाली पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी फेसबुक लाईव्ह करुन केला होता. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. आम्ही जुन्या ओळखीचे आहोत. गैरसमजुतीतून वाद वाढत होते, बरेच वर्ष एकमेकांना तोंड दाखवलं नाही. हे वाद आम्ही परिवार म्हणून मिटवत आहोत. यावरून कोणीही राजकारण करू नये, असं माधवी खंडाळकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.
रुपाली ठोंबरे पाटलांवर आरोप गैरसमजातून, आरोप करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण#माधवीखंडाळकर #rupalithombrepatil #व्हिडिओ व्हायरल #socialmedia pic.twitter.com/H6hQE1y0SV
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) ३१ ऑक्टोबर २०२५
Madhvi Khandalkar: कृपा करून कोणी याचं कसलंही राजकारण करू नये
नमस्कार मी माधवी खंडाळकर आज दिवसभरात जे काही चाललेला आहे त्याच्यात कोणतीही राजकीय घडामोडी नव्हती. मी रूपाली पाटील असू दे प्रिया पाटील असू दे आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो. काही गैरसमजुती मधून आणि काही गोष्टींमधून हे वाद विवाद वाढत चालले होते गेली बरीच वर्ष आम्ही एकमेकांना तोंड सुद्धा दाखवत नव्हतो. अचानक या सगळ्यांमधून काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. आता ते सगळे वाद आम्ही पर्सनली एक परिवार समजून सर्व वाद मिटवत आहोत. त्यामुळे कृपा करून कोणी याचं कसलंही राजकारण करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करते, असं मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांनी म्हटल आहे.
Rupali Patil Thombare: रूपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्टीकरणात म्हटलं….
तर रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी एका व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये म्हटलं आहे, मी बीडमध्ये आहे. बीडमधून मी आता पुण्याला येत आहे. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदडलं असेल, घरातल्या कोणी का मारलेलं आहे? काय वाद झाला आहे? या सगळ्याचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. याबाबत इतकंच कळलं आहे की, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार देत आहेत. काय तक्रार देत आहेत? कशाबाबत तक्रार देत आहेत? काय झालेलं आहे? याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेन, सगळ्या माध्यमांना संपूर्ण महाराष्ट्राला मी माहिती घेऊन सांगेन. इथे कोणाचा काय वाद झाला आहे? कोण गंभीर आहेत? खंडाळकर कोण आहेत? माझ्या घरचे कोण आहेत? काय वाद झाला आहे? त्याची माहिती मी घेईन, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. एकमेकांविरोधात तक्रार देत आहेत, कोणाची चूक आहे ते समोर येईल, हा खुलासा फक्त मी बाहेर आहे बीडमध्ये आहे त्यामुळे देत आहे, असेही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.