मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश


मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंग आर्थिक व्यवहारानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) यांच्या कंपनीलाही पुण्यातील (Pune) 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टंपड्युटीव्हर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. विरोधकांनी याप्रकरणी रान उठवल्यानंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली असून पुण्यातील संबंधित जागा प्रकरणी तहसिलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांनी हे आदेश दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत विकल्याचे प्रकरण उजेडात आले, विशेष म्हणजे या व्यवहारात स्टँप ड्युटीही 500 फक्त आकारण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता कारवाईचे सिग्नल दिल्यानंतर आता 2 तासांच्या आतच याप्रकरणात तहसलिदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.

पुणे पार्थ पवार यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या जमीन प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या यांच्या अध्यक्षतेखालीखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे त्यामुळेत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता, याप्रकरणी अजित पवार आणि पार्थ पवार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुय्यम निबंधक रवींद्र तारूही निलंबित

पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी झालेल्या जमीन व्यवहारप्रकरणी तहसीलदारांनंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुही निलंबित झाले आहेत. याप्रकरणी, नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलीय. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची आणि मोलाच्या 40 एकर जागेचा बेकायदा व्यवहार करुन मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करीत, पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने ही जागा खरेदी केल्याचं मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे, हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असल्याचे दाखवून पुण्यातील उपनिबंधक रवींद्र तारुंना निलंबित करण्यात आले आहे.  मुद्रांक शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय.

हेही वाचा

पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, स्टँप ड्युटीही 500 फक्त रु; उद्योगमंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.