पुणे ZP ला शरद पवारांच्या पक्षासोबत आघाडी करावी, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर सूर, काय घडणार?


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं वरळी डोम येथे सलग पाच दिवस जिल्हावार मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुती म्हणून राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची निवडणूक भाजपविरोधात लढवावी अशी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, पुणे जिल्हा परिषदेत भाजप नको फार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करावी अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळं अजित पवार यांची कोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका भाजपविरोधात लढवण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज मुंबईतील वरळी डोम येथे पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक भाजपविरोधात लढवावी, अशी भूमिका मांडली. त्याचवेळी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपसोबत युती नको, फार तर शरद पवारांच्या एनसीपीसोबत आघाडी करावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शरद पवारांच्या एनसीपीशी आघाडी चालेल, पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेनं अजित पवारांची कोंडी?

पुणे जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे जिल्हा परिषदेवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं इथं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे मनपा आणि पिंपरी मनपा भाजपा विरोधात निवडणूक लढवावी, असा सूर लावल्याची माहिती आहे. पुणे जिल्हा परिषदेत भाजपा नको फार तर शरद पवार एनसीपी सोबत आघाडी करा, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर लावल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपा नको, शरद पवार एनसीपी चालेल असा सूर लावल्याने अजित पवारांची कोंडी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहरची बैठक अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थित पार पडली.या बैठकीत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील या समोरा समोर आल्या. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षामधील प्रवक्त्यांची कानउघडणी केली. प्रवक्त्यांनी आपली भूमिका मांडताना नीट मंडावी या भूमिकेमुळे पक्षाची बदनामी होता काम नये आणि ती खपवून मी घेणार नाही, अशी सक्त ताकीद दिली आहे. प्रत्येक घडामोडींवर माझं लक्ष आहे, असं सूचक विधान या बैठकीत अजित पवार यांनी केलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.