महाराष्ट्रात पहिली महायुती रत्नागिरी जिल्ह्यात, सामंतांची घोषणा, रायगड सिंधुदुर्गमध्येही होणार


उदय सामंत: महाराष्ट्रातील पहिली महायुती रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यात जाहीर केला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. शिवसेनेच्या उमेदवारची घोषणा दोन दिवसात होईल. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे असे सामंत म्हणाले. रत्नागिरी प्रमाणे सिंधुदुर्ग मध्ये देखील सन्मान जनक वाटप झाले पाहिजे. रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्याशी देखील बोलणं झाले आहे. आज रात्रीपर्यंत रायगडबाबतीत निर्णय होईल असे सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती सुद्धा अंतिम टप्प्यात

महाराष्ट्रातील पहिली महायुती रत्नागिरी जिल्ह्यात जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. हा संकल्प मेळावा आहे हा उमेदवारी मिळावी म्हणून नाही. महायुतीचेच फटाके वाजतील. महाविकास आघाडी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली त्याचा आपण बदला घेणार आहोत की नाही? असा सवाल सामंत यांनी केला. समन्वय समितीची बैठक आज झाली. निवडणुकांचा निकाल महायुतीच्या बाजूने कसा लागेल हे बघितले पाहिजे. तिकीट सर्वांनाच देता येणार नाही.

आपले सगळे इगो बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे

आपले सगळे इगो बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे असे सामंत म्हणाले. सर्वेनुसार या जिल्ह्यातील सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे. सर्वांच्या मनासारखं होणार नाही, प्रदेश वरुन जो निर्णय येईल त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे मतसामंत यांनी व्यक्त केले. 232 आमदार असताना समोरच्याचा डिपॉझिट घालून आपण निवडणूक जिंकली पाहिजे असे सामंत म्हणाले. आपापसातलं कॉम्पिटिशन आपण आजपासून थांबवा. महाविकास आघाडी आपल्याला धुळीला मिळवायची आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देखील महायुती होणार असल्याचे सामंत म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा, घडामोडींना वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती होणार ही स्वतंत्र लढणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रायगड जिल्ह्यात महायुती झाली असल्याची घोषणा सामंत यांनी केली आहे. त्याचबरोबर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यतही युती होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.