मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप; पैश्यासाठी शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप


नवी मुंबई बातम्या : राज्यभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना मुंबईसह राज्यभर मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेनं (MNS) पुन्हा एका अमराठी व्यक्तीला मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. मनसेकडून कार्यालयात बोलवून या अमराठी व्यक्तीला चोप देण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकारी यांना पैश्यासाठी शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरून नाहक त्रास देण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून हा चोप देण्यात आल्याचे बोललं जात आहे. तसेच मराठी कंपनी मालकाला सुद्धा शिवीगाळ केली, म्हणून मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी शुक्ला नावाच्या एका अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलावून चोप दिला आहे.

MNS : महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही, लिहिलेले माफीनामा

दरम्यान, या कृत्यासाठी महिलेची माफी मागायला लावून मनसेने लिहिलेले माफीनामा घेतलाहे. महाराष्ट्रमध्ये राहून मराठी महिलाना अपशब्द बोलणार नाही, असा समज ही मनसेकडून देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही. असा इशाराहे मनसेकडून देण्यात आला आहे. नवी मुंबईच्या वाशी येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी अद्याप पोलिसांनी हस्तेकास्ट नाही केल्याची माहिती आहे.

Raigad News: नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची रायगडमध्ये युती

राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढत असताना दुसरीकडे रायगडमध्ये (Raigad News) नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याचे चित्र आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र निवडणुकीला समोर जात असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लढणार असल्याची माहिती आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात भिडणार आहे. उरण नगरापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.