तू तक्रार दिली, काम सोडलं तर…’, टेंभूर्णीतील मॅनेजरला नग्न करत मारहाण प्रकरणातील हॉटेल मालकाच
सोलापूर: सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime News) समोर आली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे (Solapur Crime News) त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेलचा मालक लखन माने यानेहॉटेलमधील मॅनेजरला ही मारहाण (Solapur Crime News) केल्याची माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे, या प्रकरणातील हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime News: मॅनेजरला नग्न करत सर्वांसमोर लोखंडी पाइपने मारहाण
तर तु नीट काम करत नाही, तुला मस्ती आली आहे का? असे म्हणत मॅनेजरला नग्न करत सर्वांसमोर लोखंडी पाइपने मारहाण करणारा 7777 हॉटेल मालक लखन हरिदास माने (रा. टेंभुर्णी, ता. माढा) याच्यावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका हॉटेलमधील मॅनेजरला नग्न करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 मधील असून हॉटेलचा मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते (४४) याचा व त्याला मारहाण करणाऱ्या हॉटेल मालक लखन माने यांचा असल्याची माहिती समोर आली होती.
Solapur Crime News: ‘तु तक्रार दिली, काम सोडले तर जिवे मारणार
ऑगस्ट २०२५ मध्ये लखन हरिदास माने यांनी मॅनेजरच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने घेत अर्धनग्न करत हॉटेलबाहेर सर्व कामगारांसमोर शिवीगाळ करत, लोखंडी पाइपने मारहाण केली होती. शिवीगाळ करत ‘तु तक्रार दिली, काम सोडले तर जिवे मारणार, अशी धमकी देखील दिल्याची माहिती समोर आली होती. यावेळी हॉटेलमधील मॅनेजरला अर्धनग्न करत सर्वांसमोर लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. तसेच मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले, अशी फिर्याद निवास आप्पासाहेब नकाते यांनी दिली असून हॉटेल मालक लखन माने याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
Solapur Crime News: व्हायरल व्हिडीओबाबत मॅनेजर अन् हॉटेल मालकाने दिलेलं स्पष्टीकरण
या व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना हॉटेलचा मालक लखन माने याने त्याच्या मॅनेजरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यानी म्हटले, दुपारपासून माझा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. .तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे आणि कुठेतरी माझं आणि हॉटेलचं त्याचबरोबर मॅनेजरचाही नाव बदनाम करण्यात येत आहे. त्या मागची सत्यता काय आहे, तो व्हिडिओ काय आहे, तो व्हिडिओ कोणी काढला, का काढला, कसा काढला, ते बघूयात. तुम्हाला मॅनेजर सांगतील त्या दिवशी काय घडलं होतं, त्यावर मॅनेजरने सांगितलं की, मी गेल्या अनेक दिवसापासून या हॉटेलमध्ये कामाला आहे. चार-पाच महिन्यापूर्वी मी ड्रिंक केली होती. मला काही सुचत नव्हतं. मला घरचा टेन्शन होतं. त्यामुळे मी ड्रिंक केलं आणि त्यावेळी मी हॉटेलवर आल्यावर मला दादांनी पनिशमेंट दिली होती. पण मी काम इथच करणार आणि शिवाय मला हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचं नाव आणि दादांचं नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, या गोष्टी करू नका असं मी बोलू इच्छितो असंही व्हिडिओमध्ये मार खाणाऱ्या मॅनेजरने म्हटलं आहे.
तर पुढे हॉटेल मालकाने म्हटले हॉटेल 77 77 हे एका कुटुंबाप्रमाणे आहे. इथे काही घटना घडल्या असतील त्या मागची सत्यता काय आहे ती समजून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका. महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे चुकीचं आहे का? अशी काम करू नका, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं काही पसरवू नका जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोट आहे, मी त्या गोष्टी केल्या नाहीत. मी जे काही केलं ते मॅनेजरने तुम्हाला समोर सांगितलं आहे. जर काही विषय असते तर इतकं मोठं हॉटेल मॅनेजरच्या हातात दिलं नसतं, आमचं नातं भावासारखा आहे, त्यात गालबोट लागणार नाही. जो व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांना माझं नाव बदनाम करायचा आहे, तो हेतू त्यांचा कधीही पूर्ण होणार नाही, सत्य समोर येईल. फक्त जे खरं आहे ते हे आहे, असंही लखन माने यानी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.