महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र
ठाकरे कॅम्प आणि शिंदे कॅम्प श्वसेना युती : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित घडामोड घडली आहे. राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये (Chakan News) एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. यानिमित्ताने ‘एबीपी माझा’ने आमदार काळे यांच्याशी थेट संवाद साधला. याबाबत बोलताना बाबाजी काळे यांनी म्हटले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी (Nagarparishad Election 2025) उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळ हा निर्णय चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत आम्ही स्वबळावर लढतोय, असे बाबाजी काळे यांनी सांगितले.
मराठी: एकनाथ शिंदेंच्या आमदार-खासदारांना कानपिचक्या
मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत मुंबईतील आमदार खासदार आणि नेत्यांना बैठकीत मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्या. पालिका निवडणूक तोंडावर असताना काही नगरसेवकांनी पक्षातील आमदारांच्या तक्रारी शिंदेंकडे केल्या होत्या. आमदारांकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेकडे आलेल्या नगरसेवकांच्या कामात अडथळा निर्माण केले जात आहेत. नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने पश्चिम उपनगरयेथील काही इच्छुक विभागप्रमुख आणि काही माजी नगरसेवकरांनी नाराजी व्यक्त केली होती.
यावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिंदेंनी नाव न घेता आमदारांना समज दिली. यावर बोलताना शिंदेंनी तुमच्या निवडुकांमध्ये या सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल़े आहे. आता तुमची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणायची. मोठ्या विश्वासाने ते आपल्यासोबत आले आहेत. ताकदीने त्यांच्या मागे उभे रहायला हवे. कुणालाही ते आपल्यासोबत आल्यानंतर पश्चाताप झाला असे वाटायला नको. शेवटी आपण आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होणार आहे, पक्ष मोठा झाला की आपणही मोठे होणार. पालिका निवडणुकीत जोमाने कामाला लागा, कोण एकत्र येत आहे त्याकडे लक्ष देऊ नका. माझंही सगळीकडे लक्ष असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.