छत्रपती शिवरायांच्या 4 महिने झाकून ठेवलेल्या पुतळ्याचं अनावरण केलं, क्षत्रिय मराठा फाऊंडेशन अमि


नेरूळ: नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) समर्थनार्थ आता राज्यातील क्षत्रिय मराठा फाउंडेशन मैदानात उतरले आहे. अमित ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल क्षत्रिय मराठा फाउंडेशनने तीव्र निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण करण्यात येत असेल आणि त्यावर जर गुन्हा दाखल करण्यात येत असेल, तर महाराष्ट्रात मोगलाईच राज्य आहे का ? असा सवालही क्षत्रिय मराठा फाउंडेशनने केला आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या समर्थनार्थ आज क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष संभाजी शिर्के आज अमित ठाकरे यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहेत.(Amit Thackeray)

Amit Thackeray : पुतळ्याचे अनावरण करण्याकरता मंत्र्यांना वेळ नसेल…

संभाजी शिर्के यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं की, अमित ठाकरे यांनी अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे अनावरण केले, यावरून माझा थेट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरता मंत्र्यांना वेळ नसेल आणि अमित ठाकरे यांनी त्या पुतळ्यावरचा मळलेला आणि धुळखात पडलेलं कापड जर हटवला असेल, आणि जर ते पुतळ्याचे अनावरण करत असतील तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा गुन्हा आहे का? हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. अमित ठाकरे यांनी केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर केलेले गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजेत, याचा मी जाहीर निषेध करतो, अमित ठाकरे यांनी केलेल्या कार्याचं आम्ही कौतुक करतो, या संदर्भामध्ये आम्ही अमित ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेणार आहे, त्यांचं कौतुक करणार आहे, आणि त्यांचं अभिनंदन करणार आहे. क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष विजय मोहिते यांच्यासह आम्ही सर्वजण अमित ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचा कौतुक आणि सत्कार करणार आहे, असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue: नेमकं काय आहे प्रकरण?

नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरेंना ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच प्रकरणात त्यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यादेखत पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.

Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue: पुतळ्याला बंदीस्त करण्यात आले

नवी मुंबईतील नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi Mumbai) गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेने अनावरण केले नव्हते. खराब कपड्यांमध्ये बंदीस्त असलेल्या पुतळ्याचे रविवारी (16 नोव्हेंबर) मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अचानक अनावरण केले. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुध्दा झाली होती. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्याने बंदीस्त करण्यात आले आहे. महानगरपालिकेने छत्रपतींना बंदीस्त करून हे  मोगलाई सरकार असल्याचे सिद्ध केले, असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलाय. येत्या काळात परत एकदा गनिमी काव्याचे अनावरण करू, असा इशारा मनसेने दिला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.