मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; फडणवीस म्हणाले अभिनंदन


अमरावती : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) बिनविरोध निवडणुकांचा नवा पॅटर्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत असून सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर, नगराध्यक्षपदीही प्राजक्त पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर, दोंडाई नगरपरिषदेत भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध आल्यानंतर 7 नगरसवेकही बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) मामेभाऊही देखील बिनविरोध निवडून आले आहेत. त्यासाठी, आमदार रवि राणा यांनी पुढाकार घेतला होता. या निवडीनंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

चिखलदरा नगर पालिका निवडणुकीत आल्हाद कलोती हे निवडणुकीच्या रिंगणात होते. चिखलदरा नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 ब मधून नगरसेवक पदासाठी त्यांनी पहिल्यांचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ असलेल्या आल्हाद कलोती यांना बनविरोध विजयी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले. त्यामध्ये, आमदार रवि राणा यांनी पुढाकार घेत अखेर ही निवडणूक बिनविरोध केल्याने आल्हाद कलोती विजयी झाले आहेत. येथील प्रभागातून त्यांच्याविरुद्ध अर्ज भरलेल्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्र्‍यांचे मामेभाऊ बिनविरोध नगरसेवक बनले.

पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयानंतर आमदार रवि राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. भाऊ, बिनविरोध झालं अशी माहिती रवि राणा यांनी दिली. तर, मुख्यमंत्र्‍यांनी फोनवरुन अभिनंदन केले, विजयी मामेभावाचेही अभिनंदन करत देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निवडीवरुन रवि राणांवर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्‍यांच्या दमदाटीमुळे निवडणूक बिनविरोध

भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे, देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहे. मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करत आहेत. उमेदवाराना धमक्या दिल्या, पैसे दिले, यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी बिनविरोध निवडणुकीवर कठोर शब्दात टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. ज्या हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहेत, ते योग्य नाही. भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाला असता, नाचक्की झाली असती म्हणून दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

हेही वाचा

गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल

आणखी वाचा

Comments are closed.