गौरीच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई करायला का सांगितलं नाही? अंजली दमानियांचा स


पंकजा मुंडे पीए अनंत गर्जे पत्नी: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वरळी येथे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात जात पोलिसांशी चर्चा केली आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंना थेट सवाल विचारला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, गौरी साधी होती, पण ती स्ट्राँग होती. आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती. गौरीच्या आई-वडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास कळालं. ते बीडला लग्नात होते. तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले. त्याच्या आधी त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये पाहावे लागले. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर व्हायला वेळ लागला. आधी स्टेटमेंटमध्ये आत्महत्या केल्याचे म्हटले होते. मात्र, तिच्या वडिलांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला. आताचे एसीपी चांगले आहेत. त्यांनी ताबडतोब करेक्शन केले. आता एफआयआर केला आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा एफआयआर आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Anjali Damania on Anant Garje Wife: लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

पोस्टमार्टममध्ये घात झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सप्लिमेंटरी जोडून 302 चा गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी सांगितले असून ती फॅक्ट आहे. डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे. अशा लोकांना काय म्हणायचं? शिक्षा झाली पाहिजे हे आपण तेच तेच बोलतो. आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केलं. त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले.

Anjali Damania on Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाईबाबत का कळवलं नाही?

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, गौरी पालवे असे तिचे नाव होते. तिने आत्महत्या केली वाटत नाही. अनंत गर्जे हा तिचा पती आहे. मला यात राजकारण आणायचं नाही. पण दुख होतंय की पंकजा मुंडे यांना याबाबत रात्री कळलं असेलच. त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा. माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई करा, असं म्हणणं अपेक्षित आहे. त्यांनी ते म्हणावं ही विनंती आहे. मुलीच्या आईवडिलांना इकडे यायला वेळ लागला. त्यामुळे एफआयआर झाला. सकाळी साडे तीनला ते आले. त्यानंतर आता 11 वाजता एफआयआर दाखल केला. आत्महत्या केली असं म्हटलं गेलं. मी आणि तिच्या वडिलांनी त्याला आक्षेप घेतला, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

Mumbai crime Gauri Garje Death: पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आयुष्य संपवलं, पोलिसांची पहिली मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.