कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, जाधवांनाही शिवीगाळ
ठाणे : शहरातील (Thane) पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर काल रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहित समोर आल्यानंतर मानसेन (मनसे) पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. स्वत: मनसे नेते अविनाश जाधव यांनीच याबाबत माहिती दिली.
“कोण राज ठाकरे, कोण अविनाश जाधव, सगळे माझ्या मनात आहेत…” ”हे ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” अशा शब्दात परप्रांतिय रिक्षाचालकाने मनसे नेत्यांबद्दल अश्लिल भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. ठाण्यातील गांधी नगरमध्ये परप्रातींय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला. प्राथमिक माहितीनुसार, गाडी लावण्यावरुन हा झाला वाद झाला. या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर परीसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अभ्रद्र शिविगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करु अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आल्याने मनसेही आक्रमक झाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता, मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे. जो कोणी राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
भाजपला हेच हवं आहे, पण… – अविनाश जाधव
आमच्या नादाला लागू नका, हे भैय्या तम्ही तुमच्या घरी रहा. आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. उरलेल्या भैय्यांना देखील माझी तंबी आहे. आम्ही तुमच्या नादाला लागलो नाही, तुम्ही आमच्या दादाला लागू नका. आमच्या नादाला लागला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इतर परप्रांतियांना इशारा दिला आहे. तसेच, हे सर्व भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. भाजपाचे जे भाडखाउ नेते आहेत, जे स्टेटमेंट करतात त्यामुळे यांची हिंमत वाढते. भाजपला तेच हवं आहे, या महाराष्ट्रात मुंबई परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांकरिता सहानुभूती मिळावी आणि मत मिळावी. त्यामुळे ही लोक स्टेटमेंट करत असतात, असेही राजकारण जाधव यांनी सांगितले.
गळ्यात हात पाय द्यायला – जाधव
निवडणुका राहिल्या बाजूला निवडणुका येतात परंतु राज ठाकरे यांच्या बाबतीत चुकीचा वक्तव्य करायचं तुम्ही ठरवलं तर तुमचे हात पाय गळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक राहणार नाही, त्याची प्रचिती आता त्याला आली आहे.. भविष्यात ज्यावेळेस त्याचा जामीन होईल, तेव्हा देखील त्याला कळेल, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले. तर, नाक्यावर काही मराठी मुलं उभी होती, त्यांनी त्याला टोकलं. मराठी बोलण्यावरून हा वाद सुरू झाला, त्यानंतर त्याच्यासमोर मनसेचा बॅनर होता. बॅनर बघून तो बडबड करायला लागला. आम्ही पोहोचायच्या दोन मिनिट आधी पोलीस तिथे पोचल्यानंतर पोलिसांच्या हाताला लागला. पोलिसात त्याला आल्यानंतर आम्ही देखील घुसलो आणि त्याचा पाहुणचार मराठी स्टाईलने केला आहे, अशी माहितीही जाधव यांनी दिली.
हेही वाचा
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
आणखी वाचा
Comments are closed.